प्रदेश संघटक ज्योतीताई कुंभार यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले निवेदन

गावठाण जागा लाभधारकांना ताब्यात न दिल्यास महिला दिनी करणार आत्मदहन करण्याचा दिला इशारा…

अकलूज (बारामती झटका)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश संघटक ज्योतीताई कुंभार यांनी अकलूज येथील गावठाण जागा लाभधारकांना सोमवार दि. ७ मार्च २०२२ पर्यंत ताब्यात न दिल्यास जागतिक महिला दिनी मंगळवार दि. ८ मार्च २०२२ रोजी आत्मदहन करणार असल्याबाबतचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले आहे.

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, अकलूज येथे २००४ साली तत्कालीन ग्रामपंचायतीसाठी सुमारे १७ वर्षांपूर्वी गावठाण ३२ एकर मंजूर झाले होते. जमीन सर्हे नं. ९२/३/अ/१/पै, ९४/१/पै, ९४/२/अ/पै, ९४/२/ब/पै, ९५/१पै, ९६/२/२पै, ९६/२/२ या मिळकतीचे महाराष्ट्र सरकार अशी नोंद आहे. चालू ७/१२ दप्तरी ५१४ लाभधारकांची नोंद झाली आहे. यातील लाभधारकांकडून ग्रामपंचायत व महसूल ११,०००/- घेतले आहेत. यामधील ३२ जागांपैकी सुमारे ७ एकरमध्ये ७०० लोकांना जागा मंजूर केली आहे. त्याचे ७/१२ उतारे पण लाभधारकांना दिले आहेत. परंतु, जागेचा ताबा अद्यापपर्यंत दिला नाही. याविरोधात डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने केली, निवेदने दिली. शेवटी करो या मरो म्हणून अकलूज येथील उपविभागीय कार्यालयासमोर जमिनीत गाडून घेऊन आंदोलन केले होते. त्यावेळी तत्कालीन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी एक महिन्यात सर्वांना जागा वाटप करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आज त्याला ७ महिने झाले आहेत, तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सोमवार दि. ७ मार्च २०२२ पर्यंत याबाबत आपण वैयक्तिक लक्ष घालून या ७०० लोकांना न्याय मिळवून द्यावा. तसेच उर्वरित शिल्लक जागा पण गरजू लोकांना वाटप करण्याबाबत नियोजन करून हा विषय मार्गी लावावा. अन्यथा मंगळवार दि. ८ मार्च जागतिक महिला दिनी कोणत्याही शासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रदेश संघटक ज्योतीताई कुंभार यांनी सदर निवेदनात दिला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्व. समाजभूषण नानासाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन.
Next articleमाळशिरस येथे भव्य रक्तदान व महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here