प्रभागातील समस्या व जनतेच्या अडचणी सोडविला असल्यामुळे मंगल गेजगे यांचा विजय निश्‍चित : संतोषआबा वाघमोडे.

नगरसेवक संतोष आबा वाघमोडे यांनी कुटुंबप्रमुख प्रमुखा सारखी आमची पाच वर्ष सेवा केली मतदारांची भावना आहे. संतोष आबांना साथ देण्यासाठी मंगल गेजगे यांच्या पाठीशी ठाम.


माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधील अपक्ष उमेदवार मंगल जगन्नाथ गेजगे निवडणुकीत गेल्या पाच वर्षात प्रभागातील रस्ते लाईट वीज स्मशानभूमी अशा अनेक समस्या समस्या व जनतेच्या अडचणी सोडविलेल्या असल्यामुळे अपक्ष उमेदवार मंगल गेजगे निवडून येतील असा विश्वास विद्यमान नगरसेवक संतोष आबा वाघमोडे यांनी दिला. आमच्या प्रभागांमध्ये संतोष आबांना आम्ही निवडून दिले त्यांनी आम्हाला कुटुंब प्रमुख का सारखी आमची पाच वर्ष सेवा केली वेळोवेळी अडचणीला धावून आलेले आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्या विचाराचा उमेदवार मंगल गेजगे यांना उभे केलेले आहे संतोष आबांना साथ देण्यासाठी मंगल गेजगे यांच्या पाठीशी ठाम असल्याची भावना मतदारांच्या मधून बोलली जात आहे.


माळशिरस नगरपंचायत च्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत संतोष आबा आमच्या प्रभागा मधून निवडणुकीसाठी उभे होते आम्ही सर्व मतदारांनी आबांच्या पाठीशी ठाम उभा राहिलो आबानी सुद्धा निवडणुकीच्या वेळी आम्हाला दिलेला विश्वास सार्थ करून दाखवला त्यांनी प्रभागांमधील अनेक अडचणी सोडविल्या आहेत. प्रभागांमध्ये स्मशानभूमीची ज्वलंत अडचण होते स्मशान भूमी चा प्रश्न मिटवला आणि सर्व जाती धर्मातील लोकांची अडचण दूर केलेली आहे. प्रभागांमधील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण डांबरीकरण करून दळणवळणाची सोय उपलब्ध केलेली आहे. पाण्याची पाईप लाईन बसून ठीकठिकाणी हापसाच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न मी ठेवलेला आहे. संपूर्ण परिसरामध्ये स्वतः उभे राहून एलईडी बल बसवून घेतलेले आहेत गावाच्या बाहेर प्रभाग असल्यामुळे घनकचरा साठी कचरा गाडी येत नव्हती आबांनी कचरा गाडी प्रभागांमध्ये सुरू केली. प्रभागांमध्ये संपूर्ण माळशिरस शहराला पाणी पुरवठा करण्याकरता पाण्याचा वॉटर टॅंक आहे. लोकांची प्रातर्विधीची अडचण ओळखून आबांनी व्यक्तिगत व सार्वजनिक शौचालय उभी करून लोकांनी शौचालयाचा वापर सुरू केल्याने वॉटर टॅंक परिसरातील घाण व कचरा बंद झाला. कोरोना सारख्या महाभयंकर संसर्ग रोगाच्या वेळी लाॅकडॉउन करण्यात आलेले होते . छोटे-मोठे व्यवसाय बंद पडलेले होते प्रभागांमध्ये अनेक लोक हातावरची कोठे असणारी उद्योग धंदा बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली होती अशावेळी अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू व पालेभाज्या यांचे किट बनवून प्रभागातील संपूर्ण घरातील लोकांना वाटप करण्यात आले होते. प्रभागातील लोकांच्या दवाखान्याच्या अडचणी सोडविले आहेत कोरोना काळात बेड उपलब्ध करून दिले आहेत दवाखान्याची पैशाची अडचण सुद्धा दूर केलेली आहे अनेक लोकांना रेशन कार्ड काढून शासनाच्या स्कीम मध्ये बसलेले आहे. प्रभागांमधील आबांनी कोणाचेही लग्न वाढदिवस लहान मुलांचा असं वाचवा मोठ्या माणसांचा मयत झालेले असो अशा सर्व सुख दुःखामध्ये सामील होऊन कुटुंब प्रमुखा सारखी जबाबदारी आबांनी पूर्ण केलेली आहे. आरक्षणामध्ये आमचा प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला आहे तरीसुद्धा आबांनी आमच्यावरील प्रेम कमी केलेले नाही आरक्षण कडून किती तरी दिवस झाले तरीसुद्धा आबा आमच्या अडीअडचणीला नेहमी धावून आलेले आहेत बाबांनी त्यांच्या विचाराचा उमेदवार सौ मंगल जगन्नाथ गेजगे यांना अपक्ष उमेदवारी दिलेली आहे. त्यांचे चिन्ह नारळ आहे प्रभागांमध्ये पुरुष 607 आहेत स्त्रिया 561 आहेत. आमच्या प्रभागांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये बाबांनी आम्हाला तळहाताच्या फोडासारखे जपलेली आहे वेळोवेळी अडचणीत मदत केलेली आहे सुख दुःखा मध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे आम्ही नगरसेवक संतोष आबा वाघमोडे यांनी उभा केलेले उमेदवार मंगल गेजगे यांच्या पाठीशी ठाम असल्याची भावना प्रभाग क्रमांक 14 मधील मतदारांच्या मधून बोलली जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमोहिते-पाटील यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे महाळुंग नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे उमेदवार अडचणीत.
Next articleमेडद ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत नाथाआबा लवटे पाटील व नवनाथ जगताप यांच्यात चुरशीची लढत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here