प्रयत्न करत राहा, यश नक्कीच मिळते – वर्षा पाटील, अभिनेत्री

मुंबई (बारामती झटका)

महाराष्ट्रभर गाजत असेलेली मराठी सिरियल म्हणजेच बाळूमामाच्या नावानं चांगभलं. आत्ताच या मालिकेचे १००० भाग पुर्ण झाले आहेत. आता या मालिकेत महालींगरायाची कथा सुरु आहे आणि याच कथेमधे महालिंगरायाच्या आईच्या भूमिकेत आली आहे आपली सर्वांची लाडकी वर्षाराणी म्हणजेच वर्षा पाटील.

वर्षा ही मुळ बीड जिल्हातील मोरेवाडी या छोट्याशा गावात राहणारी मुलगी आहे. तिला तशी शालेय जिवनापासूनच कलेची आवड होती. पण खेड्यागावातून तिला तिचे हे स्वप्न पुर्ण करता आले नाही. लग्नानंतर ती पुण्यात आल्यामुळे तिच्या स्वप्ननांना दिशा मिळाली. ‘एक झुंज वादळाशी’ या व्यावसायिक नाटकातून तिने अभिनय क्षेत्रात आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. आणि यानंतर सातत्य, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नाने तिनं मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक कामं मिळवली. तिचा हा प्रवास खडतर असला तरी तिच्या सोबत तिच्या आईवडिलांचे आशीर्वाद आहेत. तसेच तिच्या मुलाची आणि नवऱ्याचीही तिला खंबीर साथ आहे. आजपर्यंत तिने घेतला वसा टाकू नको, आई कुठे काय करते, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, गाथा नवनाथांची, ज्ञानेश्वर माऊली अशा अनेक मराठी मालिकेत तिने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

तसेच वरात घुसली घरात, प्रेमाच्या प्रेमात, रंगभूमी शपथ, खेरीज अशा नावाजलेल्या नाटकांमधेही तिने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तसेच महिंद्रा ट्रॅक्टर, श्री अमृततुल्य चहा, त्रिमूर्ती उद्योगसमूह यांच्या व अशा अनेक व्यावसायिक जाहीरातीमध्येही तिने काम केलेले आहे. आपल्या पाठीवर कोणाचाही खंबीर हात नसला तरी फक्त अभिनयाच्या जोरावर आणि मेहनतीच्या बळावर ती इथंपर्यंत पोहचली आहे.

वर्षा या क्षेत्रात येणाऱ्या सर्व नवीन कलाकारांना सांगू इच्छीते की, जर तुमचा खरंच तुमच्या अभिनयावर विश्वास असेल आणि कलेवर प्रेम असेल तर तुम्ही या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होवू शकता. फक्त प्रयत्न करत रहा, यश नक्की मिळत जाईल. शेवटी प्रयत्नाअंती परमेश्वर असतो हेच खरे!!

वर्षा पाटील यांना बाळूमामाच्या नावानं चांगभलं या सिरियलसाठी व यापुढील वाटचालीसाठी खूपखूप शुभेच्छा !!

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआ. रणजितसिंह मोहिते पाटील आणि आ. राम सातपुते यांच्या शुभहस्ते विकास कामांच्या उद्घाटनाचा धूमधडाका.
Next articleभांबुर्डी येथे काळभैरवनाथ यात्रेला आजपासून सुरुवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here