प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर व मित्रपरिवार यांचा तिरुपती बालाजी दौरा भक्तिमय प्रवासाने संपन्न

माळशिरस ( बारामती झटका )

श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्था तरंगफळ ता. माळशिरस या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अपंग प्रहार संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष गोरख मारुती जानकर यांनी विविध क्षेत्रातील मित्रपरिवार यांच्यासमवेत नवीन वर्षात बालाजी दर्शन यात्रा उत्साहात आणि भक्तिमय प्रवासाने संपन्न झाली आहे. श्री. गोरख मारुती जानकर, श्री. गणेश श्रीमंत तंरगे, श्री. किसन आप्पा मासाळ, श्री. महेश भारत रोकडे, STI सेल्स टँक्स अधिकारी चि. महालिंश्वर यंशवत कारंडे, चि. अशिष पोपट बोडके, चि. अक्षय कांतीलाल भोसले, चि. संकेत संतोष मोहिते, चि. योगेश विश्वनाथ तंरगे अशा विविध क्षेत्रातील मित्र परिवार या यात्रेत होते.
सदर यात्रेची सुरुवात दि. 2 जानेवारी 2022 रात्री 2 ला रेल्वे स्टेशन सोलापुर ते रेणुगुठ्ठा रेल्वे स्टेशन 03-01-2022 ला दुपारी 1 वा. झाली.

पहिला मुक्काम ..

3-01-2022 तिरुपती येथील भक्त निवास येथे व्यवस्था होती.
4-01-2022 त्या दिवसाचा संपूर्ण परिक्रम तिरुपती मधुन वेल्लोर 116 किलोमीटर अंतरावर आहे.  सकाळी 7 वाजता 9 जन मेंबर सोबत वेल्लोर ला श्री लक्ष्मी नारायण गोल्डन टेपल येथे गाडी करून जावून दर्शन घेतले. यानंतर श्री लक्ष्मी नारायण गोल्डन टेपल चे दर्शन घेऊन माघारी तिरुपती मधील भक्त निवास येथे गेले.

04-01-2022 त्याच दिवशी दुपार नंतर तिरुपती भक्त निवास मधुन 25 किलोमीटर अंतरावर आहे. तिरुमला म्हणजेच बालाजी मंदिराकडे जाण्यासाठी रवाना झालो. तिरूमला भक्त निवास व्यवस्था मध्ये मुक्काम करण्यात आला.

05-01-2022 संपूर्ण दिवस भरचा परिक्रम श्री बालाजी स्वामींचे दर्शन ठिक सकाळी वेळ 11. वाजता घेवून महाप्रसाद घेऊन तिरुमला येथील परिसर पाहिला.

05-01-2022 चा मुक्काम ही तिरुमला येथे करण्यात आला.

06-01-2022 ला तिरुमलामधुन तिरुपतीला सकाळी ठिक 8. वाजता श्री बालाजी स्वामींचे मोठे भाऊ गोविंदा स्वामीं यांचे दर्शन घेतले.

गोविंदा स्वामींपासून पद्मावती मंदिर 2 किलोमीटर अंतरावर आहे‌ तेथे श्री बालाजी स्वामीच्या पत्नी पद्मावती मंदिर तिरुपती येथे दर्शन घेतले.

पद्मावती मंदिर दर्शन झाल्यानंतर 26 किलोमीटर अंतरावर श्रीकालहस्ती महादेव मंदिर जगातील 2 नंबर चे मंदिर आहे. मुर्तीसाठी मंदीर खुप फेमस आहे. नंतर जेवणाची व्यवस्था महाराष्ट्रीयन जेवण बुलढाणा अर्बन गेस्ट हाऊसला केले. त्यानंतर रेनुगुनठ्ठा रेल्वे स्टेशनवर गेलो.

परतीच्या प्रवासासाठी रेल्वे जाण्याची तारीख व वेळ 06-01-2022 वेळ 8.50 रात्री आहे. रेल्वे रेणुगुठ्ठा ते सोलापूर रेल्वे स्टेशन आपण सकाळी ठिक तारीख 07-01-2022 वेळ 7.10 मिनिटांनी पोहोचली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरत्नत्रय परिवारातर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा एक लाख रुपयाचा अपघात विमा
Next articleसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंतीदिनी दिव्यांग बांधवांना दिलासा मिळणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here