प्रांताधिकारी विजयकुमार देशमुख यांची अमरसिंह माने देशमुख व सतिश माने देशमुख यांनी घेतली भेट

वेळापूर (बारामती झटका)

अकलूज येथील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी / प्रांताधिकारी विजयकुमार देशमुख यांची भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष अमरसिंह माने देशमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य सतिशराव माने देशमुख यांनी भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेदरम्यान पुणे ते पंढरपूर म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे अतिशय जलदगतीने काम होत आहे ही कौतुकास्पद आहे. मात्र, या राष्ट्रीय महामार्गावरील वेळापूर, उघडेवाडी, पिसेवाडी हद्दीतील काही शेतक-यांच्या शेतजमीनी भुसंपादन केल्या आहेत. त्यांना शासकीय नियमानुसार आर्थिक मोबदला दिला आहे. परंतु, काही शेतक-यांच्या शेतजमीनी भुसंपादन केले पण आर्थिक मोबदला मिळाला नाही तो आर्थिक मोबदला लवकरात लवकर मिळावा. तसेच काही शेतक-यांना नोटीस आल्या नाहीत अथवा मिळाल्या नाहीत तेथील काम तात्पुरते थांबवून अडचणी जाणून घ्याव्यात. त्यामुळे शेतक-यांचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. आदी विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी वेळापूर मंडल अधिकारी रणसुंभे साहेब यांच्यासह वेळापूर, पिसेवाडी, उघडेवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article“ते पत्र म्हणजे सरकारचा निर्णय नव्हे”, एकरकमी FRP बाबतच्या पियुष गोयल यांच्या पत्रावर “स्वाभिमानी” ची भुमिका..
Next articleसद्गुरु श्री श्री साखर कारखान्याच्या १० व्या गाळप हंगामाचा १० ऑक्टोबर रोजी शुभारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here