प्रांत कार्यालयातील अजित जाधव यांचा पदभार काढला तर पल्लवी शिंदे यांना काढून टाकले.

पालखी महामार्गातील भूसंपादन जमिनीचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार राम सातपुते यांनी लोकसभा व विधानसभा सभागृहात अनियमितता व भ्रष्टाचाराचे प्रश्न उपस्थित केले होते.

अकलूज ( बारामती झटका )

उपविभागीय कार्यालय अकलूज विभाग माळशिरस या कार्यालयात कार्यरत असणारे अव्वल कारकून अजित जाधव यांच्याकडील पदभार काढून घेतला तर भूसंपादनासाठी खाजगी नियुक्ती केलेल्या पल्लवी शिंदे यांच्याकडील कार्यालयीन कार्यभार काढून टाकला आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यात उलट सुलट चर्चेने उधान घेतलेले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या भूसंपादन जमिनीच्या अनियमितता व भ्रष्टाचाराचे प्रश्न माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभेत तर माळशिरस विधान सभा मतदार संघाचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केलेले होते.

तत्कालीन प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकारी शमा पवार यांनी भूसंपादन कामासाठी महेश सतीश देशमाने व पल्लवी शिंदे यांना प्रांत कार्यालयात भूसंपादन कार्यासाठी नियुक्त केलेले होते. शमा पवार यांची सोलापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी बदली झाल्यानंतर प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी पदभार घेतलेला होता. त्यावेळेस भूसंपादन प्रक्रियेसाठी खाजगी सेवेत असणारे महेश सतीश देशमाने यांच्याकडील कामकाज काढून त्यांना घरचा रस्ता दाखवलेला होता. सध्या डॉ. विजय देशमुख रजेवर आहेत, प्रांताधिकारी पदभार मंगळवेढ्याची प्रांताधिकारी बाबासाहेब समिंदर यांच्याकडे आहे. त्यांनी अव्वल कारकून अजित जाधव यांच्याकडून पदभार काढून घेतलेला आहे, तर खाजगी कर्मचारी पल्लवी शिंदे यांना काढून टाकलेले आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यामध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आलेले आहे.

भूसंपादन जमिनी करीत असताना प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्याशी संबंध येत असतो. भूसंपादन अधिकारी कार्यालयाच्या बाहेर शासकीय कामानिमित्त गेलेले असताना भूसंपादन कर्मचारी यांच्याशी थेट संबंध बाधित शेतकरी यांचा येत असतो. अचानक प्रांताधिकारी यांनी अव्वल कारकून व खाजगी कर्मचारी यांच्यावर कारवाई का केली, याविषयी संभ्रम निर्माण झालेला आहे. सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सविस्तर माहिती घेऊन प्रसार माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. प्रांत कार्यालयामध्ये अव्वल कारकून अजित जाधव यांचा पदभार देण्याचा कार्यालयीन कामकाज सुरू आहे. त्यांची नेमणूक इस्लामपूर मंडलमध्ये मंडलाधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे अतिरिक्त प्रांताधिकारी कार्यालयातील पदभार होता. पल्लवी शिंदे यांनाही काढून टाकलेले आहे, अशी माहिती प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार देसाई मॅडम यांनी दिलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन सुरू.
Next articleवेळापूर येथील अर्धनारीनटेश्वर यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष उद्योजक उमेश भाकरे यांचा सन्मान संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here