प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पत्र्याचे शेड मारून अतिक्रमण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे अनाधिकृत पत्रा शेडची केली तक्रार.

मांडवे ( बारामती झटका )

मांडवे ता. माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरील संरक्षक भिंतीशेजारी गेटच्या बाजुला अतिक्रमण करून पत्रा शेड बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सदरच्या अनाधिकृत पत्रा शेडबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामपंचायतीस पत्र देऊन योग्य ती कारवाई करावी, असा पत्रव्यवहार केलेला आहे. सदरचे पत्र ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत मांडवे यांना दिलेले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी संरक्षक भिंतीच्या आणि मांडवे गिरवी डांबरी रस्त्याच्या कडेला गेटच्या बाजूस भलेमोठे पत्रा शेड उभे करण्याचे काम सुरू आहे. सध्या पत्रा शेड उभे राहिलेले आहे. सदर ठिकाणी मुरूम दगड आणलेले आहेत, कोबा करावयाचे बाकी आहे. बेकायदेशीर अतिक्रमण करून पत्रा शेड उभारण्यात येत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामपंचायत यांना पत्र देऊन कळविलेले आहे. आपल्या स्तरावर आपण कारवाई करून सदरचे शेड काढण्यास सहकार्य करावे असे पत्र दिलेले आहे. त्यामुळे मांडवे ग्रामपंचायत बेकायदेशीर शेडविषयी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलेले आहे. जर ग्रामपंचायतीने डोळेझाक केली तर निश्चितपणे अतिक्रमणाची रांग लागेल, अशी सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleदेशमुखपट्टा सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी सचिन देशमुख तर व्हाईस चेअरमनपदी सौ.जनाबाई देशमुख यांची निवड.
Next articleआ. राम सातपुते यांच्या गाडीचा अपघात, वेळापूरच्या शंभू महादेवाच्या नगरीत सुखरूप, काळजी करण्याचे कारण नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here