प्रादेशिक सहसंचालक साखर यांचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांना लेखी देण्याचे आदेश.

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या थकित एफआरपी आंदोलकांची प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर यांनी घेतली दखल.

सदाशिवनगर ( बारामती झटका )

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे कारखाना स्थळावर मोहिते-पाटील गटाचे माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर भैया सुळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय शेतकरी संघटना, ऊस उत्पादक सभासद, शेतकरी व कामगार यांचे बेमुदत धरणे आंदोलन गेल्या 13 दिवसापासून सुरू आहे. सदर आंदोलनास कारखाना प्रशासन, प्रादेशिक सहसंचालक, माळशिरसचे तहसीलदार यांनी भेटी देऊन आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा करून कारखाना प्रशासन यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला होता. आंदोलनकर्ते लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलनापासून परावृत्त होणार नाहीत, अशी ठाम भूमिका घेतलेली होती. प्रादेशिक सहसंचालक राजेंद्र दराडे यांनी आंदोलनकर्ते यांची भूमिका रास्त असल्यामुळे श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगर ता. माळशिरस या कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांना पत्र देऊन आपल्या व्यवस्थापन कमिटीचे जे धोरण आहे ते संबंधित आंदोलकांना लेखी आश्वासन देऊन त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यात यावे. या संबंधाने भविष्यात काही उद्भवल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी, असे पत्र पाठवून सदर पत्राची प्रत साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे यांना दिलेली आहे.सदर पत्रामध्ये आपले लक्ष वेधून कळविण्यात येते की, आपल्या कारखान्याच्या आवारात ऊस उत्पादक शेतकरी उपोषणास बसले आहेत हे आपणास विधीतच आहे. आपल्या कारखान्याने गाळप हंगाम 2014 – 2015 मध्ये 4,33,955 मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची रुपये 8082.51 लाख देयकापैकी रुपये 7116.80 लाख अदा केल्याने कारखान्याकडे दि. 15/3/2016 अखेर 915.71 लाख (नऊ कोटी पंधरा लाख एक्काहत्तर हजार फक्त) इतकेच ऊस बिल असल्याने माननीय आयुक्त साखर महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेश क्रमांक जा. क्र. साआ /कक्ष 7/ अर्थ-1/ आर आर सी/हं 14-15/5589/2016 दि. 24/05/2016 रोजी आरआरसी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.गाळप हंगाम 2015 – 2016 मध्ये 1, 77, 951 मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची 3621.36 लाख देयकापैकी रुपये 813. 65 लाख अदा केल्याने कारखान्याकडे दि. 30/04/2016 अखेर रुपये 2807.71 लाख (अठ्ठावीस कोटी सात लाख एक्काहत्तर हजार) थकित दिलं असल्याने माननीय साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेश क्रमांक जा/ क्र/साआ/ कक्ष 7 अर्थ – 1 आर आर सी/हं 15-16 /20 16 दि. 10/05/2016 रोजी आर आर सी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.सदरची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्याकरता संबंधित शेतकरी आपल्या कारखान्यावर उपोषणास बसलेले आहेत. दि. 12/11/2021 रोजी आपल्या कारखान्यावर भेट दिली असता भेटी दरम्यान आपले व्यवस्थापन समिती सदस्य व कार्यकारी संचालक यांनी चर्चेदरम्यान असे सांगितले की, श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर, ता. माळशिरस जिल्हा सोलापूर सन 2016 – 2017 पासून बंद होता. तोट्यात असताना व अनेक देणी थकीत असताना ऊस उत्पादक सभासदांच्या हितासाठी सन 2021-2022 विनापरवाना चालू केले आहे. मागील थकित एफआरपी सन 2015-2016 ची रुपये 2807.71 लाख रकमेपैकी 20 टक्के साधारण रुपये 560 लाख अदा केले आहे व या सीझनमध्ये परत 20% देत आहोत व उर्वरित 60 टक्के रक्कम पुढील तीन वर्षात 20% टक्के प्रमाणे देण्यात येईल असे सांगितलेली आहे.तरी आपणास कळविण्यात येते की, आपल्या व्यवस्थापन कमिटीचे जे धोरण आहे ते संबंधित आंदोलकांना लेखी आश्वासन देऊन त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यात यावे या संबंधाने भविष्यात काही उद्भवल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे पत्र राजेंद्रकुमार दराडे प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर विभाग सोलापूर यांनी श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांना जावक क्रमांक 1495/2021 या आदेशाने देऊन सदर पत्राची प्रत माहितीसाठी साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे पाठवलेली आहे.आंदोलनकर्ते यांनी आंदोलन सुरू केल्यापासून कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी यांचा छुपा पाठिंबा आहे. शेतकरी सभासद उघड उघड आंदोलनाकडे येत नाहीत मात्र, हस्ते परहस्ते आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा शेतकरी व सभासद यांचा आहे. आंदोलनामध्ये सामील झालेले पाऊस, थंडी, ऊन, वारा याची तमा न बाळगता शेतकरी व सभासद यांनी घरून आणलेले पिठलं भाकरी खाऊन बेमुदत धरणे आंदोलन गेली चौदा दिवस सुरू आहे. कारखाना प्रशासनाने डोळेझाक केली मात्र, साखर सहसंचालक यांनी सभासदांचे हित व आंदोलनकर्ते यांची लेखी आश्वासन यावर ठाम भूमिका यामुळे हे आंदोलन लांबलेले होते. साखर सहसंचालक यांच्या पत्राने कारखाना प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआदर्श ग्रामपंचायत धर्मपुरी चे लोकनियुक्त सरपंच बाजीराव काटकर यांना विभागीय आयुक्तांचा दणका.
Next articleशेतकऱ्यांची जुलमी महावसुली बंद करून सरकार व महावितरण ताळ्यावर आणण्यासाठी मोर्चाचे आयोजन – आमदार राम सातपुते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here