प्रा.डॉ. शिवाजीराव पाटील व लेफ्टनंट प्रा. केशव पवार यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

सातारा (बारामती झटका)

रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. शिवाजीराव पाटील व एन.सी.सी. कमांडर लेफ्टनंट प्रा.केशव पवार यांना राष्ट्रीय
मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दि. 5 डिसेंबर 2021 रोजी सोलापूर येथे पार पडलेल्या प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघ – प्रोटॉन च्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्याहस्ते विशेष प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले.

प्रोफेसर डॉ. शिवाजीराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक तसेच छत्रपती शिवाजी कॉलेज येथील स्पर्धा परीक्षेचे विभाग प्रमुख
म्हणून काम करीत आहेत. अध्ययन व अध्यापनाबरोबरच बुध्द, फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सामाजिक समतेचा विचार बहुजन समाजात रुजविण्याचे काम ते निष्ठेने करीत आहेत. लेफ्टनंट प्रा. केशव पवार रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक तसेच एन.सी.सी कमांडर म्हणून अध्ययन-अध्यापन व सैनिकी प्रशिक्षणाचे काम तन्मयतेने करण्यासोबतच बुध्द, फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सामाजिक समतेचा विचार बहुजन समाजात रुजविण्याचे काम निष्ठेने करीत आहेत. डॉ. शिवाजीराव पाटील व लेफ्टनंट प्रा. केशव पवार हे अध्ययन-अध्यापन- संशोधन या सोबतच बहुजन समाजात संविधानिक विवेकवादी विचार प्रसारित करीत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, उपप्राचार्य डॉ. रोशनारा शेख, डॉ. रामराजे माने देशमुख, गुणवत्ता हमी कक्षचे समन्वयक डॉ. अनिलकुमार वावरे, शिवाजी विद्यापीठ प्रोटॉन अध्यक्ष डॉ. मुरली भाणारकर, सातारा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, डॉ. सुभाष वाघमारे, डॉ. सादिक तांबोळी, प्रा. शौकत शेख, डॉ. अरुणकुमार सकटे, प्रा. तानाजी देवकुळे, डॉ. अभिजित पोरे, अधीक्षक तानाजी सपकाळ तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक स्टाफ यांनी अभिनंदन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसौ. लीलावती फत्तेसिंह कदम यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
Next articleसर्वोच्च न्यायालयाचे ओबीसी जागेच्या निवडणुका रद्द करण्याचे आदेश, निवडणूक आयोगाला प्रक्रियेला सुरुवात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here