प्रा. डॉ. संजय रणदिवे यांचे नेट परीक्षेत यश

अंकोली (बारामती झटका)

मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील रहिवासी प्रा.डॉ. संजय बाळासाहेब रणदिवे यांनी नेट परिक्षेत भरघोस यश संपादन केले आहे. पी. ई. एस. शिक्षणशास्त्र महाविद्यालय, फर्मागुडी, फोंडा, गोवा येथे कार्यरत असणारे प्रा. डॉ. संजय रणदिवे यांनी युजीसी कडून नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) शिक्षणशास्त्र या परीक्षेत हे यश संपादन केले आहे. यापूर्वीही ते राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) शिक्षणशास्त्र ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तसेच त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथून पीएच.डी.ची पदवी संपादन केली आहे.

प्रा. डॉ. संजय रणदिवे गेल्या बारा वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक तथा चेअरमन माजी मुख्यमंत्री आ. रवी नाईक, संस्था सचिव रितेश नाईक, प्रा. गुरुप्रसाद खानोलकर यांनी कौतुक आणि अभिनंदन केले आहे. 

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्रकाश काले “लेखनरत्न” पुरस्काराने सन्मानित
Next articleराष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर प्रदेशमध्ये शंभर उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here