अकलूज (बारामती झटका)
ताराराणी महिला कुस्ती संकुल शंकरनगर अकलूजचे कोच प्राध्यापक सुहास महादेव तरंगे सर यांनी क्रीडाक्षेत्रातील शासनाच्या अधीन असलेले S AI प्रशिक्षण केंद्र पंजाब येथे कुस्ती प्रशिक्षण गुणवत्ता पूर्ण मार्क मिळवून N S-NIS कुस्ती प्रशिक्षक पदवी मिळवली. त्यामुळे प्राध्यापक तरंगे सर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
तरंगे सर हे उत्कृष्ट कुस्तीपटू होते. त्यांना कुस्तीची आवड असल्या कारणाने ते ताराराणी कुस्ती केंद्र येथे कोच म्हणून कार्यरत आहेत. तरंगे सर यांचे सोलापूर जिल्हा भाजपाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील, तरंगफळ विकास सोसायटीचे माजी चेअरमन ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. शांतीलाल उत्तमराव तरंगे, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गोरख मारुती जानकर, कै. शंकरराव मोहिते पाटील माळशिरस तालुका स्वस्त धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष महादेव तरंगे, रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सहकारी संघाचे संचालक सुजित तरंगे, सामाजिक कार्यकर्ते नारायण तरंगे, तरंगफळचे माजी उपसरपंच सतीश कांबळे, आरपीआयचे अध्यक्ष शशिकांत साळवे, विकास सोसायटीचे माजी चेअरमन बाप्पू अण्णा तरंगे यांचेसह ग्रामस्थ व सहकारी मित्रांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng