सातारा (बारामती झटका)
सातारा छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. सुभाष वाघमारे यांनी अतिशय सुंदर अशी कविता लिहून त्यांनी या कवितेतून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. या कवितेतून त्यांनी मनसे किती सरळमार्गी आहेत, हे सांगितले आहेत. त्यांच्या साध्या जीवनमानाविषयी, साधेपणाविषयी सांगितले आहे.
तसे आम्ही सरळमार्गी ! [कविता ]
पाकिटात बंद करूनी | कष्टाची कबुतरे
जीव देतो अधिकारे | आम्ही सरळमार्गी
घेउनी कंत्राटे पुन्हा | देतो टक्केवारी
करतो असे तसे काम | आम्ही सरळमार्गी
रोजच्या गर्दीने इथे | उखडले डांबर
भरतो वर्षाला टेंडर | आम्ही सरळमार्गी
विकसनशील देशातील मी | भरतो रेशन
मिळेना पावतीला स्टेशन | आम्ही सरळमार्गी
देऊन चिरीमिरी | करतो सुखांचे संसार
हा रोकडा व्यवहार | आम्ही सरळमार्गी
जास्त कशाला उत्पन्न ? दाखवायचे आपण
नको पापाचे दर्शन | आम्ही सरळमार्गी
सर्वांच्या आधी रातचे जाऊन | पाटकरयाला कोंबडे देऊन
नाही कोणासही त्रास, रान जाते भिजून | असे आम्ही सरळमार्गी
भरती कार्यालये इथे | चहाच्या गाड्यावर
तसा माणुसकीचा व्यवहार | आम्ही सरळमार्गी
शिकवायला जाता आम्ही | पडतो किती आजारी
बुडवतो न तास कधीही | आम्ही सरळमार्गी
लोकांची गरज पैशाची | माहीत आहे आम्हा
देतो वोटला नोट इथे | आम्ही सरळमार्गी
कपडे बांधून तोंडाला | भरतात कुठे लॉज
देतो प्रेमाला आधार | आम्ही सरळमार्गी
असतो खुला व्यवहार | दोन पार्टीचा आधार
उगी कशाला भरू कर ? आम्ही सरळमार्गी
पावणे आहेत ते आमचे | करतील ना काम
हसत करू आराम | आम्ही सरळमार्गी
आम्हीही मागासवर्गीय | द्या ना आरक्षण
हुंड्यासाठी किती धन ? आम्ही सरळमार्गी
ओढ्यातील वाळू नेती कितीजण, कुणी करावी राखण ?
कशाला बोलू उगा मी | आम्ही सरळमार्गी
आमचे वैर नाही कोठे | सर्वांशी चांगुलपण
अहो, भ्रष्टाचारी कुणाला म्हणता ? आम्ही सरळमार्गी ….
प्रोफेसर डॉ.सुभाष वाघमारे ९८९०७२६४४०
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng