प.पू. सदगुरु श्री डॉ. भाईनाथ महाराज पादुका सोहळ्याचे गुरुवारी प्रस्थान

वेळापूर (बारामती झटका)

प.पू. सदगुरु श्री गजानन महाराज गुप्ते (नाशिक) यांच्या ७५ व्या पुण्यतिथीनिमित्त प. पू. सदगुरु श्री. डॉ. भाईनाथ महाराज कारखानीस यांच्या पादुकांचा श्री क्षेत्र वेळापूर ते श्री क्षेत्र नाशिक व परत श्री क्षेत्र वेळापूर या सोहळ्याचे गुरुवारी सकाळी ७ वाजता प्रस्थान होत आहे. वेळापूर येथील श्री आनंदमूर्ती सेवा मंडळाच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम पाळून वाहनाने हा सोहळा गुरुवार दि. ७ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र वेळापूरहून श्री क्षेत्र नाशिककडे प्रस्थान ठेवीत आहे. सोहळ्याचे हे दहावे वर्ष आहे.
गुरुवारी सकाळी ६ वाजता श्री आनंदमूर्ती सत्संग भवन, वेळापूर येथे ॲड. डी. एस. राऊत व सौ. दिपा राऊत या उभयतांच्या हस्ते श्रींची प्रस्थान पूजा, महाभिषेक व आरती केली जाईल. सकाळी ७.१५ वाजता हा सोहळा श्री अर्धनारीनटेश्वर मंदिरात येइल. येथे पादुकांचा भेटीचा सोहळा होइल. तेथून सकाळी ७.३० वाजता श्रीधर कुटी, वेळापूर येथील समाधी मंदिर व निवासस्थान येथे पादुका दर्शनासाठी ठेवल्या जातील.
सकाळी ९ वाजता शंकरनगर, अकलूज येथे जयसिंह मोहिते पाटील निवासस्थानी व सकाळी १० वाजता श्री खराडे – पाटील यांचे निवासस्थानी पादुकांची पूजा व आरती होइल व सोहळा पुढे मार्गस्थ होइल. सकाळी ११.३० वाजता निमसाखर येथे श्री. अभिजीत रणवरे निवासस्थानी, दुपारी १ वाजता योगिराज इंडस्ट्रीज, एम आय डी सी – बारामती येथे अरुण म्हसवडे यांच्या हस्ते पूजा, आरती व महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता गोपाळवाडी, दौंड येथे श्री. हनुमंतराव गाडे यांचे निवासस्थानी, सायंकाळी ६ वाजता मडेवडगाव येथे श्री. शिवाजीराव जाधव, श्री. अरुण वाबळे यांचे निवासस्थानी, सायंकाळी ७ वाजता श्रीअशोकराव चौधरी यांच्या सिध्दीविनायक मंगल कार्यालय, घारगाव येथे सोहळा पहिल्या मुक्कामी पोहोचेल.

शुक्रवार दि. ८ ऑक्टोबर सकाळी ६ वाजता पादुकांची पुजा व आरती श्री. अशोक चौधरी यांचे हस्ते, सकाळी ८ वाजता श्री. संदेश कार्ले, खंडाळा, सकाळी ९ वाजता श्रीसार्थक गंधे – पाटील सावेडी – अहमदनगर, सकाळी १० वाजता श्री. सीताराम होडगर, विळद, सकाळी १०.३० वाजता श्री. विठ्ठल भागवत काळे, देहरे, दुपारी १२ वाजता दुपारची आरती, नैवेद्य व महाप्रसाद श्री. बन्सीलाल चौधरी, शिंगवे नाईक येथे होइल. दुपारी ३ वाजता श्री. शामराव दळे दळेवस्ती – कोलार, सायंकाळी ५ वाजता श्री. नवनाथ आहेर, आहेर क्लॉथ स्टोअर्स, तळेगांव दिघे येथे, सायंकाळी ६ वाजता श्री. राजेश्वर जाधव राजयोग मंगल कार्यालय, शिंदे, रात्रो ७ वाजता श्री क्षेत्र नाशिक मुक्काम श्रीचंद्रकांत गवळी यांचेवतीने आरती व महानैवेद्य होइल.

शनिवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता प. पू. सदगुरु श्री गजानन महाराज गुप्ते व प. पू. सदगुरु श्री. डॉ. भाईनाथ महाराज कारखानीस यांच्या पादुकांना गंगा स्नान, सकाळी ९ वाजता प. पू. सदगुरु श्री गजानन महाराज गुप्ते, प. पू. सदगुरु श्री. दादामहाराज चिटणीस व प. पू. सदगुरु श्री. डॉ. भाईनाथ महाराज कारखानीस यांच्या समाधीची पूजा, महाभिषेक व आरती, सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत भजन, दुपारी १२ वाजता प. पू. सदगुरु श्री गजानन महाराज गुप्ते पुण्यतिथी उत्सव पुष्पांजली, आरती व महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता श्री. संदीप आव्हाड, नाशिक यांचे निवासस्थानी, सायंकाळी ६ वाजता श्रीमती मानिनी कनसारा, नाशिक यांचे निवासस्थानी रात्रो ८ वाजता श्री. गोरक्षनाथ पाटील यांचे निवासस्थानी पादुकांची पूजा, महानैवेद्य व आरती.

रविवार दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता पादुकांची पूजा व आरती श्री क्षेत्र नाशिक ते श्री क्षेत्र वेळापूर परतीचा प्रवास, सकाळी ९ वाजता श्री. लक्ष्मणराव आव्हाड यांचे निवासस्थानी शिवाजीनगर – माळेवाडी, दुपारी १२ वाजता श्री चंद्रकांत वाव्हळ यांचे निवासस्थानी, आळेफाटा, दुपारी २ वाजता श्री. रेडे महाराज मंदिर, आळेफाटा, सायंकाळी ७ वाजता जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर, श्री क्षेत्र देहू मुक्काम.

सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता पादुकांची पूजा व आरती सकाळी ७ वाजता पादुकांना इंद्रायणी स्नान श्री संत तुकाराम महाराज व प. पू. सदगुरु श्री. भाईनाथ महाराज पादुका भेट सोहळा, श्री क्षेत्र देहू, सकाळी ९ वाजता श्री संत ज्ञानेश्वर माऊली व प. पू. सदगुरु श्री भाईनाथ महाराज पादुका भेट सोहळा, श्री क्षेत्र आळंदी दुपारी १२ वाजता दुपारची पूजा, आरती व महानैवेद्य कॅप्टन श्री. आमसिध्द भिसे यांचे “आनंदमूर्ती” निवासस्थानी दिघी – पुणे, सायंकाळी ५ वाजता जेजुरी, रात्रो ८ वाजता, श्री सतीश बडवे यांचे निवासस्थान, नातेपुते, रात्रो १० वाजता श्री आनंदमूर्ती सत्संग भवन, श्री क्षेत्र वेळापूर येथे उत्सवाची सांगता होइल .
श्रींच्या पादुकांचा संपूर्ण प्रवास वाहनाने आहे. पादुका समवेत २० ते २५ सेवेकरी राहणार आहेत. पादुका आपले घरी आल्यानंतर मास्क, सॅनिटायझर्सचा वापर करावा, सरकारी नियमांचे पालन करुन सोशल डिस्टन्स पाळावा, असे सोहळ्याचे संयोजक व श्री आनंदमूर्ती सेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी आवाहन केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनिमगाव विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांचे वह्या, पुस्तके आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत
Next articleस्त्रियांनी आता सावित्रीबाईंप्रमाणे रणरागिणी व्हावे – ॲड. रवींद्र पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here