जिल्हा परिषद शिक्षिका सौ.सुगंधा दुर्योधन पाटील यांच्या मार्गदर्शनात सार्थक घडला.
नातेपुते ( बारामती झटका )
फडतरी तालुका माळशिरस या गावातील चिरंजीव सार्थक दुर्योधन पाटील याने पोखरापूर तालुका मोहोळ येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्याप्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेले आहे. त्याबद्दल विधान परिषदेचे मा. आमदार रामहरी रुपनवर यांनी सार्थक पाटील यांचा सन्मान केला यावेळी फडतरी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अर्जुन दादा रुपनवर, प्राध्यापक दुर्योधन पाटील, बाळासाहेब मुलानी, स्वीय सहाय्यक इरफान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ सुगंधा दुर्योधन पाटील यांच्या मार्गदर्शनात सार्थक घडला आहे. फडतरी गावचे सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक दुर्योधन पाटील हे श्री महालक्ष्मी विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोही तालुका माण जिल्हा सातारा येथे कार्यरत आहेत.त्यांच्या धर्मपत्नी सौ सुगंधा पाटील यांचे मूळ माहेर परांडा जिल्हा उस्मानाबाद येथील आहे. त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका आहेत. पती-पत्नी सुसंस्कृत व सुशिक्षित असल्याने त्यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केलेले आहेत . पाटील दाम्पत्यांना सार्थक व स्वराली दोन अपत्य आहेत त्यापैकी सार्थक याने पाचवी मधून जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर प्रवेश परीक्षेमध्ये यश संपादन केलेले आहे तर स्वराली इयत्ता पहिली मध्ये शिकत आहे.

सार्थक जूनियर व सिनियर केजी नातेपुते येथील महा किड्स इंग्लिश स्कूल मध्ये शिकलेला आहे. पहिली अहमदनगर जिल्ह्य कर्जत तालुक्यातील नवले वस्ती जिल्हा परिषद शाळेमध्ये होता.इयत्ता दुसरी खेड मध्ये झालेली आहे तर तिसरी आणि चौथी पुन्हा महा किड्स नातेपुते येथे झालेली आहे.पाचवी नातेपुते एज्युकेशन नातेपुतेच्या दाते प्रशाला नातेपुते येथे पाचवी मध्ये शिक्षण घेत असताना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पास झालेला आहे त्यामुळे पोखरापूर येथील शाळेत सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होणार आहे. सार्थक याच्या यशामध्ये आई सुगंधा पाटील यांचे योगदान मोलाचे आहे बदली ठिकाणी जाऊन मुलांना शिकवणे आणि स्वतःच्या मुलाचा घरकाम करून अभ्यास घेणे असा त्रास सहन करून सुद्धा त्यांनी सार्थक चे यश मिळवलेले आहे. फडतरी गावची साडेपाच हजार लोकसंख्या वस्ती असणारे गाव आहे.नातेपुते सरहद्दीवर फडतरी ची शिव सुरू होते. फडतरी गावांमध्ये तीन दशकांपूर्वी एका मुलीने जवाहर नवोदय विद्यालय मध्ये यश संपादन केले होते त्यानंतर सार्थक दुर्योधन पाटील यांनी यश संपादन केले आहे. फडतरी गावचे पोलीस पाटील दिलीप लवटे पाटील बापूराव उर्फ भाऊसाहेब पाटील हनुमंत लवटे,सागर पाटील,रणजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng