फडतरी गावाला प्रा. दुर्योधन पाटील यांच्या रूपाने गतिमान उपसरपंच मिळाला.

फडतरी, निटवेवाडी, शिवारवस्ती या ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विद्याविभूषित, उच्चशिक्षित प्राध्यापक दुर्योधन पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड.

फडतरी ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील फडतरी निटवेवाडी, शिवारवस्ती, या ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्राध्यापक दुर्योधन विठ्ठल पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड गुरुवार दि. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे माळशिरस पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी तथा निवडणूक निरीक्षक ए. एम. सरवदे यांनी जाहीर केली. यावेळी मावळते उपसरपंच आप्पा रुपनवर यांनी नूतन बिनविरोध उपसरपंच प्राध्यापक दुर्योधन पाटील यांचा सन्मान केला. यावेळी सरपंच सौ. प्रियांका निटवे व सदस्य उपस्थित होते.
फरतडी, निटवेवाडी, शिवारवस्ती या ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक फेब्रुवारी 2021 साली होती. सरपंचपदी प्रियांका बाबुराव निटवे तर उपसरपंचपदी आप्पा हनुमंत रुपनवर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली होती. उपसरपंच आप्पा हनुमंत रुपनवर यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला. रिक्त झालेल्या उपसरपंच पदी प्राध्यापक दुर्योधन विठ्ठल पाटील यांची सर्वानुमते ग्रामपंचायत कार्यालयात निवड करण्यात आली होती. यावेळी सरपंच प्रियांका बापूराव निटवे, मावळते उपसरपंच आप्पा हनुमंत रुपनवर, ग्रामपंचायत सदस्या पुष्पा बापूराव पाटील, विजय नाना रुपनवर, संगीता अर्जुन होळ, गौरी धनंजय रुपनवर, दुर्योधन विठ्ठल पाटील, सागर रोहिदास गुळीग, मनीषा महावीर रुपनवर, शशिकांत सिताराम निटवे, गिरजाबाई दगडू ठोंबरे, आदी सदस्य उपस्थित होते.


उपसरपंच निवडीवेळी सोसायटी चेअरमन अर्जुनदादा रुपनवर, माजी सरपंच बाबा माधव रुपनवर, माजी सरपंच आजिनाथ रुपनवर, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक रुपनवर, धर्मराज ठोंबरे ( माजी उपसरपंच), बिरूदेव ठोंबरे (माजी उपसरपंच), दुर्योधन ढोबळे (संस्थापक ज्ञानदीप शिक्षण संस्था), युवक अध्यक्ष संजय रुपनवर, सेवा सोसायटी सचिव बापूराव पाटील, पांडुरंग रुपनवर, पोपट पाटील, कैलास रुपनवर, पिंटूआप्पा रुपनवर, रमेश रुपनवर, सागर रुपनवर, गजाबा रुपनवर, धनंजय रूपनवर, भारत रणवरे, नितीन सुतार, नामदेव पाटील, किसन पाटील, आरपीआय अध्यक्ष हनुमंत भोसले, सुनील पाटील, गोरख रुपनवर, ज्योतीराम पाटील, गजानन चव्हाण, बाबू मुलाणी, ईश्वर सोरटे, युवराज रुपनवर, सुनील पाटील, बाळासाहेब पाटील, रमेश रुपनवर, धनंजय माने सर, सागर रुपनवर, किसन पाटील, आलिफ मुलाणी, नितीन सुतार आदी मान्यवरांसह गावातील नेते व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुर्योधन विठ्ठल पाटील यांचा जन्म निटवेवाडी येथे झालेला आहे. पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पाटीलवस्ती फरतडी येथे झाले आहे. आठवी ते दहावी श्रीनाथ विद्यालय लोंढे मोहितेवाडी, अकरावी ते बारावी दाते प्रशाला नातेपुते, पदवी विजयसिंह मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते येथे पूर्ण केलेली आहे. दुर्योधन पाटील यांनी भूगोल, समाजशास्त्र, इतिहास, मराठी इत्यादी विषयांमध्ये मास्टर पदवी संपादन केलेली आहे. शिरपूर जि‌. धुळे येथे बी. एड. पूर्ण केले असून सध्या भूगोल विषयांमध्ये पीएचडी सुरू असून अंतिम टप्प्यात आलेली आहे. प्राध्यापक दुर्योधन पाटील यांची शैक्षणिक सामाजिक राजकीय घोडदौड सुरू आहे. ते सध्या श्री महालक्ष्मी जुनियर कॉलेज मोही येथे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. म्हसवड येथील बारावी परीक्षेचे केंद्रप्रमुख आहेत. श्री रामहरी रुपनवर नागरी पतसंस्था नातेपुते व जय मल्हार बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था या दोन संस्थेवर संचालक आहेत. त्यांचे फरतडी पंचक्रोशीतील लोकांच्या पोलीस स्टेशन, एम. एस. ई. बी., कृषी कार्यालय व अनेक असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कायम सहकार्य असते. शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करण्याचे काम सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळवून देणे, स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे काम सुरू असते.

ग्रामपंचायतच्या सदस्यपदी निवडून आल्यापासून ग्रामपंचायतमध्ये वेगळा पायंडा पडलेला आहे. ग्रामपंचायतीच्या खर्चातून कोणता सदस्य चहासुद्धा पीत नाही. मासिक मीटिंगच्या वेळी क्रमाने सदस्य चहाचे बिल देत असतात, अशा आदर्श ग्रामपंचायतीचे उच्च विद्याविभूषित उपसरपंच प्राध्यापक दुर्योधन पाटील लाभलेले आहेत. ग्रामपंचायतमध्ये अनेक दिवसाचे प्रलंबित प्रश्न व विकास कामे गतीमान करण्याचा त्यांचा मनोदय आहे. फडतरी ग्रामपंचायत मधून शिवार वस्ती स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासाठी अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यासाठी प्रयत्न करणार आहेत. फरतडी गावची लोकसंख्या पाच हजाराच्या आसपास असून साडेतीन हजार मतदार आहेत. गावाचा विस्तार मोठा आहे. वाड्या-वस्त्या वर सिंगल फ्युज करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक कार्याची आवड असणारे प्राध्यापक दुर्योधन पाटील राजकारणातील चौरंगी चिरा समजला जात आहे. त्यांची निवड झाल्यानंतर काही दिवसातच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक बिगूल वाजलेला आहे. कोणत्या गटाकडे किंवा पक्षाकडे जातील याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. चौरंगी चिरा कोणाच्या हातात लागतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमेडदचे ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे धाव, अन्यथा उपोषणाचा इशारा.
Next articleरिपब्लिकन पक्षाचे धुरंधर नेतृत्व राजाभाऊ सरवदे यांचे ‘चळवळीतील योगदान’ पुस्तक प्रकाशित करणार – बी. टी. शिवशरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here