फडतरी ( बारामती झटका )
फडतरी ता. माळशिरस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्राध्यापक दुर्योधन विठ्ठल पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड गुरुवार दि. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे माळशिरस पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी तथा निवडणूक निरीक्षक ए. एम. सरवदे यांनी जाहीर केली. यावेळेस निवडणूक सचिव तथा ग्रामसेवक बी.एम. होळ यांनी निवडणूक प्रक्रियेत सहकार्य केले.
फडतरी, निटवेवाडी, शिवार वस्ती या ग्रुप ग्रामपंचायतीची 1962 साली स्थापना झालेली आहे. आजपर्यंत या गावांमध्ये सरपंच व उपसरपंच या पदावर काम केलेले आहे. फडतरी ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन फेब्रुवारी २०२१ साली सरपंचपदी प्रियांका बाबुराव निटवे तर उपसरपंचपदी आप्पा हनुमंत रुपनवर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली होती. उपसरपंच आप्पा हनुमंत रुपनवर यांनी स्वेच्छेने राजीनामा दिलेला होता. रिक्त झालेल्या उपसरपंच पदी प्राध्यापक दुर्योधन विठ्ठल पाटील यांची सर्वानुमते ग्रामपंचायत कार्यालयात निवड करण्यात आली. यावेळी सरपंच प्रियांका बापूराव निटवे, मावळते उपसरपंच आप्पा हनुमंत रुपनवर, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा बापूराव पाटील, विजय नाना रुपनवर, संगीता अर्जुन होळ, गौरी धनंजय रुपनवर, दुर्योधन विठ्ठल पाटील, सागर रोहिदास गुळीग, मनीषा महावीर रुपनवर, शशिकांत सिताराम निटवे, गिरजाबाई दगडू ठोंबरे आदी सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायत उपसरपंच निवडीच्यावेळी माजी सरपंच आजिनाथ रुपनवर, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक रुपनवर, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अर्जुन रुपनवर, माजी उपसरपंच धर्मराज ठोंबरे, बिरा ठोंबरे, युवक अध्यक्ष संजय रुपनवर, सेवा सोसायटी सचिव बापूराव पाटील, पांडुरंग रुपनवर, पोपट पाटील, भारत रणवरे, आरपीआय अध्यक्ष हनुमंत भोसले, गजानन चव्हाण, बाबू मुलाणी, ईश्वर सोरटे आदी मान्यवरांसह गावातील नेते व कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक अधिकारी यांनी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये उपसरपंचपदी प्राध्यापक दुर्योधन पाटील यांच्या निवडीची घोषणा करताच मावळते उपसरपंच आप्पा रुपनवर यांनी नूतन उपसरपंच प्राध्यापक दुर्योधन पाटील यांचा सन्मान केला. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात बैठक संपन्न झाली.

प्राध्यापक दुर्योधन पाटील यांच्या निवडीची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली. सरपंच, मावळते उपसरपंच व नूतन सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, उत्साही कार्यकर्ते गावातील मंदिराच्या देवदर्शनासाठी वाजत गाजत रवाना झाले.
सरपंच
१. रामचंद्र तुकाराम रूपनवर
२. विठ्ठल बाबा रूपनवर
३. दादा बापू रूपनवर
४. दादा बापू रूपनवर
५. दादा बापू रूपनवर
६. माणिक महादेव निटवे
७. बाबा माधव रूपनवर
८. अजिनाथ बाबा रूपनवर
९. विठ्ठल रामचंद्र रूपनवर
१०.अजिनाथ बाबा रूपनवर
११. पद्मिनी विनोद गुळीक
१२. विनोद गणपत रूपनवर
१३. बिरा तात्याबा ठोंबरे
१४. प्रियंका बापूराव निटवे
उपसरपंच
१. हणमंत नारायण पाटील
२. दादू सावळा ठोंबरे
३. मनोहर गिरजाप्पा चव्हाण
४. भानुदास आण्णा चव्हाण
५. अर्जुन बाबा बोधले
६. सदाशिव जगन्नाथ गुळीक
७. बाबुराव दशरथ ननवरे
८. शिवाजी शंकर जठार
९. सखुबाई चंद्रकांत रूपनवर
१०.लक्ष्मण विष्णू रूपनवर
११. धर्मा नामदेव ठोंबरे
१२. बिरा तात्याबा ठोंबरे
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng