फडतरी विकास सेवा सोसायटीच्या बिनविरोध संचालक मंडळातील चेअरमन व व्हाईस चेअरमन कोण होणार ? लागली उत्सुकता…

फडतरी गावचे विद्यमान उपसरपंच प्राध्यापक दुर्योधन पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष, गुरुवारी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्या निवडी होणार जाहीर…

फडतरी (बारामती झटका)

फडतरी ता. माळशिरस येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक फडतरी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच प्रा. दुर्योधन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध करण्यात आली होती. श्री. एल. एम. शिंदे तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक संस्था कार्यालय अकलूज यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 20/04/2022 रोजी फरतडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित परळी, ता. माळशिरस या संस्थेच्या सन 2021-22 ते 2026-27 या कालावधीसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली.
साधारण खातेदार कर्जदार गटात लवटे महावीर दादा, होळ विष्णू बापू, ठोंबरे नातू कोरा, रुपनवर वैभव आजिनाथ, इंगळे दादा काशिनाथ, रुपनवर अर्जुन दादा, पाटील मारुती तुकाराम, निटवे हिराप्पा बंडा, अनुसूचित जाती जमाती गटात सोरटे यशवंत चिंतू, महिला प्रतिनिधी गटात कचरे पगाबाई महादेव, जाधव इंदुमती गणपत, इतर मागास प्रवर्ग गटात मुलाणी गणीम अब्दुल, भटक्या जमाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटात रुपनवर पांडुरंग राजाराम असे तेरा सदस्य यांची बिनविरोध निवड झालेली होती.

फडतरी वि. का. से. सोसायटीची स्थापना १९२३ साली झाली. या सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु सदर विकास कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक न लागता बिनविरोध व्हावी यादृष्टीने विद्यमान उपसरपंच प्राध्यापक दुर्योधन रुपनर पाटील यांनी विशेष प्रयत्न केले त्यांना सहकार्य माजी उपसरपंच धर्मराज ठोंबरे, माजी सरपंच अजिनाथ पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष अशोक रुपनवर, पोलीस पाटील दिलीप लवटे, माजी उपसरपंच आप्पा रुपनवर, ग्रामपंचायत सदस्य विजय रुपनवर, शिवाजी रुपनवर, पिंटू रुपनवर, पोपट रुपनवर, कैलास रुपनवर यांचे सहकार्य लाभलेले होते.

सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. ए. एम. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली फरतडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कार्यालयामध्ये गुरुवार दि. 12/5/2022 रोजी स. 11 वा. सर्व संचालक मंडळाची सभा पार पडणार आहे. यामध्ये चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी होणार आहेत. याकडे गावचे लक्ष लागून राहिलेले आहे. मार्गदर्शक प्राध्यापक दुर्योधन रुपनवर पाटील चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालतील ? याकडे पंचक्रोशीतील जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते टायझर कपड्याच्या शोरूमचा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न.
Next articleएकशिव पाणी वापर संस्थेतील भ्रष्टाचारामुळे संचालक मंडळ बरखास्त.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here