फलटण तालुक्यातील मुंजवडी गावची कन्या माळशिरस नगरपंचायतची बनली नगरसेविका.

हमाली करणा-या जगन्नाथाचा मुलगा झाला मेकॅनिकल इंजिनिअर, तर पत्नी झाली नगरपंचायतची नगरसेविका.

माळशिरस ( बारामती झटका )


माळशिरस नगरपंचायत 2021- 22 पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये माजी नगरसेवक संतोषआबा वाघमोडे यांनी प्रभागांमध्ये केलेली विकास कामे, जनतेच्या सोडविलेल्या अडीअडचणी लोकांना वेळोवेळी केलेले सहकार्य व किंगमेकर तात्यासाहेब वाघमोडे यांच्या सहकार्याने हमाली करणारे जगन्नाथ गेजगे त्यांच्या धर्मपत्नी सौ. मंगलताई गेजगे विजयी झालेल्या आहेत. होलार समाजाच्या नगरसेविका होण्याचा बहुमान सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच फलटण तालुक्यातील मुंजवडी गावच्या कन्या सौ. मंगलताई जगन्नाथ गेजगे यांच्या रुपाने मिळालेला आहे .


गोरख किसन गेजगे व सौ. गिताबाई गोरख गेजगे यांचे मुळगाव माण तालुक्यातील कारखेल. पण उपजीविका व उद्योग व्यवसाय करण्यासाठी त्यांचे माळशिरस शहरात स्थलांतर झालेले होते. त्यांना जगन्नाथ व बळीराम ही दोन मुले तर एक मुलगी होती. घरची परिस्थिती बेताची व हलाखीची असल्याने जगन्नाथ यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले होते. मिळेल ते काम करून उपजीविका सुरू होती. त्यांना 1995 साली फलटण तालुक्यातील मुंजवडी गावातील दादा भागुजी मोरे व ताराबाई दादा मोरे यांची कन्या मंगल यांच्याशी विवाह झालेला होता. जगन्नाथ व मंगल यांना प्रमोद मुलगा आणि एक कन्या आहे. जगन्नाथ व मंगल यांनी मनाशी खूणगाठ बांधली कितीही कष्ट झाले तरी चालेल परंतु आपली मुले शिक्षित करायची असा ध्यास घेतलेला होता 2006 साली जगन्नाथ गेजगे यांनी निंबाळकर यांच्या भुसार मालाच्या दुकानांमध्ये हमालीस सुरुवात केली‌ आजतागायत निंबाळकर यांच्याकडे हमाली करीत आहेत. जगन्नाथ यांनी मुलगा प्रमोद यास मेकॅनिकल इंजिनिअर केले कन्येचा विवाह बारामती तालुक्यातील वडगाव सोमेश्वर येथील महेश खांडेकर यांच्याशी केलेला आहे. सध्या महेश खांडेकर पालघर येथील पोलीस प्रशासनात कार्यरत आहेत. जगन्नाथ गेजगे हमाली करीत असल्याने अनेक बागायतदार शेतकरी व्यापारी यांच्याशी दैनंदिन संबंध येत होता. जगन्नाथ यांचा सुसंस्कृत स्वभाव, आचार विचार आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे त्यांच्याविषयी समाजामध्ये आपुलकीची भावना निर्माण झालेली होती.


माळशिरस नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 14 अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला होता सदर प्रभागाचे प्रतिनिधित्व नगरसेवक संतोषआबा वाघमोडे यांनी केलेले होते. त्यांनी केलेले कार्य आणि त्यांचा जनसंपर्क याला जगन्नाथ गेजगे यांच्या स्वभावाची जोड लागलेली असल्याने अटीतटीच्या निवडणुकीत सौ. मंगलताई जगनाथ गेजगे विजयी झालेल्या आहेत. सौ मंगलताई गेजगे यांच्या सासर व माहेर मध्ये राजकीय वारस मात्र जनतेने त्यांना नगरपंचायत मध्ये जुनी तिची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. सौ मंगलताई गेजगे होलार समाजाचा असल्याने सोलापूर जिल्ह्यात होलार समाजाचा यांच्या रूपाने नगरसेवक होण्याचा बहुमान मिळाला आहे. होलार समाजासह अनेक लोकांनी त्यांचा सन्मान केलेला आहे काही दिवसांमध्ये त्यांचे मूळ माहेर फलटण तालुक्यातील मुंजवडी येथे होणार आहे जगन्नाथ गेजगे यांना बंधू बळीराम यांची कायम साथ लक्ष्मणा सारखी मिळत आहे. गोरख गेजगे यांचे निधन झालेले आहे. श्रीमती गिताबाई यांनी सून नगरसेविका झालेली पाहण्याचा योग आलेला आहे तर कन्या नगरसेविका झालेली दादा मोरे व सौ ताराबाई मोरे यांना पाहता आले गावच्या कन्येचे गोड कौतुक थोड्याच दिवसात मुंजवडी येथे होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआजचा अर्थसंकल्प हा देशाला गती-शक्ती देणारा अर्थसंकल्प नसून देशाला अधोगतीकडे येणारा अर्थसंकल्प आहे – रविकांत वरपे
Next articleफडतरी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रा. दुर्योधन पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here