फलटण पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, लाखो रुपयांचा गुटखा केला जप्त

गुटखा विक्री करणाऱ्या इसमावर छापा टाकून १,३३,४७१ रू. किमतीचा गुटखा जप्त

फलटण (बारामती झटका)

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गोडसे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, फलटण तालुक्यातील वाजेगाव या गावच्या हद्दीत केशव विठोबा गायकवाड वय. ६० वर्षे, रा. वाजेगाव, पो. निंबळक, ता. फलटण हा त्याच्या सुरज किराणा जनरल स्टोअर्स दुकानांमध्ये गुटख्याची चोरटी विक्री करीत आहे. ही माहिती मिळताच सदर ठिकाणी छापा घालण्याचे आदेश पोलीस निरीक्षक गोडसे यांनी दिल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस स्टाफने दोन पंचासह छापा टाकला असता या दुकानाच्या बाहेर असलेले जिन्याखाली एकूण २१,७९८ रु. गुटका विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केलेला मिळून आल्याने पोलिसांनी लागलीच पंचाचे समक्ष जप्ती पंचनामा करून मुद्देमाल व आरोपी ताब्यात घेतले.

आरोपी केशव विठोबा गायकवाड ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. ३९६/२०२२ भा.द.वि‌.स. कलम ३३८, १८८, २७२, २७३ अन्नसुरक्षा आणि मानके अवि. २००६ चे कलम २६(२)(i)(iv),२७(३)(e),३०(२)(a)५९ अन्नसुरक्षा आणि मानके नियमावली २०११ चे कलम ३,१,७,२,३,४, प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर आरोपीस मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सो. फलटण यांच्या कोर्टातून पोलिस कस्टडी मंजूर करून घेऊन या आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने सदरचा गुटखा हा फलटण येथील संतोष जोशी यांच्या दुकानातून घेऊन आल्याचे सांगितले. त्यानंतर फलटण पोलिस स्टेशनचे पोलीस व पंच असे संतोष रतनलाल जोशी यांच्या दुकानात गेल्यावर दुकाना शेजारील गोडाऊनमध्ये तसेच आरोपी क्रमांक दोन यांचे राहते घराच्या खाली असलेल्या किराणा मालाच्या गोळ्यांमध्ये गोडाउन मध्ये एकूण १,२१,६६३ रु. किमतीचा गुटखा मिळून आल्याने सदर मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. या आरोपीस पोलिस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक सातारा अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा अजित बोर्हाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीसचे धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, उर्मिला गेडाम, दादासो यादव, अभिजीत काशीद, राजेंद्र गायकवाड, अमोल जगदाळे व गणेश अवघडे यांनी केली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमोरोची येथील ५२ शेतकरी बांधवांचा प्रशिक्षण व प्रक्षेत्र भेटीसाठी सहभाग…
Next articleचि. तेजस झंजे, मेडद आणि चि.सौ.कां. सानिका वाघमोडे, उंबरे (द.) यांचा शाही विवाहसोहळा संपन्न होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here