फलटण बाजार समीतीचे चेअरमन स्व. बी. के. भाऊ निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वरोग निदान आरोग्य शिबीर संपन्न

सासकल (बारामती झटका)

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात जनजीवन विस्कळीत झाले. असंख्य लोकांना या आजाराची लागण झाली तर, अनेकजण त्यात दगावले. या आजाराबरोबरच आज लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज आहे. हे समजून फलटण बाजार समीतीचे चेअरमन राष्ट्रपती आदर्श शिक्षक स्व. बी. के. भाऊ निंबाळकर याच्या ८० व्या जयंतीनिमित्त सर्व रोग निदान मोफत आरोग्य शिबीर सासकल येथील भैरवनाथ मंदिर येथे घेण्यात आले.

यामध्ये आयुर्वेदिक सर्वरोग निदान शिबीर घेतले. लोकांनी या शिबिराचा मोठय़ा प्रमाणात लाभ घेतला व लोकांची तपासणी करून त्यांना योग्य उपचार घेण्यास सांगण्यात आले. या कार्यक्रमावेळी विंचुर्णी गावचे मा. सरपंच व पश्चिम महाराष्ट्र भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सुशांत निंबाळकर व सातारा जिल्हा आदर्श महिला सरपंच पुरस्कार प्राप्त सौ .अस्मिता निंबाळकर, राजवीर निंबाळकर, शांभवी निंबाळकर, गावचे जेष्ठ व साखरवाडी कारखानाचे मा. संचालक बी. के. भाऊ यांचे परममित्र नामदेवरावआप्पा मुळीक, स्टार हेल्थ चे सातारा व पुणे एस. एम. रमेश घाडगे, सरपंच सौ. उशाताई राजेंद्र फुले, उपसरपंच नितीन धनाजी घोरपडे, मनोहर मुळीक, तंटामुक्त अध्यक्ष मा. सरपंच मोहन मुळीक, सेविका आशा मुळीक, हनमंतराव सोनवलकर पोलिस पाटील, हनमंत मुळीक ग्रा.प. सदस्य, भिमराव वारे, दत्तात्रय दळवी, स्मिता दळवी, राजेंद्र सस्ते शिक्षक, दत्तात्रय सस्ते, ग्रामसेवक आण्णा, ग्रामपंचायत कर्मचारी विंचुर्णी तंटामुक्ती अध्यक्ष दीपक निंबाळकर, बाळासो इथापे आदींसह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर शिबिरात डॉ. व्ही. आय. मुजावर BAMS MD AM, डॉ. भगत, डॉ. सिध्दानाथ यांनी आरोग्यविषयी मार्गदर्शन केले व ग्रामस्थांना योग्य तो सल्ला दिला. या शिबिरासाठी लोकांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल शिबिरातील डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले. सदर शिबिरास संजीवनी सामाजिक संस्था फलटण यांनी सहयोग दिला. कृषीरत्न बी केभाऊ निंबाळकर पुरक संस्था पदाधिकारी विंचुर्णी व ग्रामपंचायत सासकल चे ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपार्थदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पार्थ पवार फाउंडेशनच्यावतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
Next articleस्व. समाजभूषण नानासाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here