फळपिक विमा उतरविणे काळाची गरज – सतीश कचरे मंडळ कृषी अधिकारी

नातेपुते (बारामती झटका)

डाळींब, पेरु, सिताफळ या पिकाखालील क्षेत्र कार्यक्षेत्रात खुप मोठ्या प्रमाणावर आहे. फळ पिकाचे बाजारमुल्य असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. परंतू हवामान धोक्यापासून फळपिकाचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होते व मोठा तोटा सहन करावा लागतो. हवामान घटकापासून होणाऱ्या तोट्याच्या झळा शेतकरी बांधवांना लागू नये, म्हणून हवामान आधारित फळपिक विमा योजना सन २०२१ पासून सन २०२४ पर्यंत लागू केली आहे. या विमा योजने अंतर्गत मृग बहारसाठी विमा भरणेसाठी पेरु ३ वर्षे, डाळिंब – २ वर्षे, सिताफळ – ३ वर्षे, आंबा – ५ वर्षे वय असलेल्या फळपिकाचा विमा कवच लाभ घेता येतो. यासाठी प्रति लाभार्थी ४ हे खातेदार कुळ, भाडेपट्टा करार कर्जदार व बिगर कर्जदार शेतक्यांना लाभ घेता येतो. ज्या महसुल मंडळामध्ये सदर पिकाचे २० हे. व त्यापेक्षा जास्त क्षेत्र आहे ते मंडळ आधिसुचीत मंडळ घोषीत केले जाते. प्रत्येक महसुल मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्रांच्या तापमान पाऊसमान नोंदी डाटा आधारे या योजनेची भरपाई दिली जाते.

खालील विमा प्रिमीअम रक्कम व नुकसान भरपाई हेक्टरी आहेत. २.५ मिली पेक्षा कमी पाऊस पावसाचा खंड समजण्यात येतो. पेरू – मृग बहार विमा प्रिमीअम भरणेची अंतीम मुदत – ३० जून विमा हप्ता – ३,००० रु/हे. विमा संरक्षण ६०,००० रु.हे. १ – कमी पाऊस – १५ जून ते १४ जुलै ७६ ते १०० मिली पाऊस – १२,००० रु. नुकसान भरपाई व या कालावधीत ७६ मिली पेक्षा कमी पाऊस ३०,००० रु. नुकसान भरपाई देय राहील. २ – पावसाचा खंड व जास्त तपमान – १५ जुलै ते १५ ऑगस्ट सलग १५ ते २१ दिवस पाऊस खंड व ३२ डिग्री सेंटी. सलग ३ दिवस तापमान १२,००० रु. नकसान भरपाई व २१ दिवस पेक्षा जास्त सलग पाऊस खंड व ३२ डिग्री सेंटी. पेक्षा जास्त ३ दिवस तापमान ३०,००० रु. नुकसान भरपाई रक्कम देय राहील. डाळिंब – मृग बहार विमा प्रिमीयम भरणेची अंतीम मुदत १४ जुलै विमा हत्ता ६,५०० रु/हे. विमा संरक्षण १,३०,००० रु./हे. १ – पाऊस खंड – १५ जुलै ते १५ ऑगस्ट सलग ३० दिवस पाऊस खंड – ५,९०० रु. नुकसान भरपाई, सलग २१ ते २५ दिवस पाऊस खंड ११,८०० रु. नुकसान भरपाई, सलग २५ दिवस पेक्षा जास्त पाऊस खंड १७,७०० रु. नुकसान भरपाई देय राहील. २ – पावसाचा खंड – १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर – सलग २० दिवस पाऊस खंड – १७,२०० रु. नुकसान भरपाई, सलग २१ ते २५ दिवस खंड २९,००० रु. नुकसान भरपाई व २५ दिवसापेक्षा जास्त खंड ४१,३०० रु. नुकसान भरपाई देय राहील . ३ – जास्त पाऊस – १६ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ४५ ते ६० मिली पाऊस पडलेस ११,८०० रु. नुकसान भरपाई, ६० ते ९० मिली पाऊस पडल्यास २९,००० रु. नुकसान भरपाई, व एका दिवसास ९० मिली पाऊस पडल्यास ७१,००० रु. नुकसान भरपाई देय राहील. सिताफळ – मृग बहार विमा प्रिमीयम भरण्याची अंतीम मुदत ३१ जुलै विमा हप्ता ४,००० रु./हे. विमा संरक्षण ८०,००० रु./हे. १ – पावसाचा खंड – १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर सलग १५ दिवस पाऊस खंड ९,९०० रु. नुकसान भरपाई, सलग २० दिवस पाऊस खंड १६,५०० रु. नुकसान भरपाई व सलग २५ दिवस पाऊस खंड ३३,००० रु. नुकसान भरपाई देय राहील. २ जास्त पाऊस – १ दिवस ४० मिली पाऊस ८,८oo रु. नुकसान भरपाई व २ दिवस ४० मिली पाऊस २२,००० रु. नुकसान भरपाई देय राहील. शेतकरी कुळ भाडेपट्टा करार बांधवांनी त्या गटाच्या पीक नोंदीसह सातबारा आठअ आधार कार्ड सह त्याचे खाते असलेल्या बँका सोसायटी विमा एजंट, सिएससी सेंटरमध्ये पिक निहाय विहीत मुदतीत लागवड क्षेत्रानुसार विमा हप्ता भरावा व संबंधीतांना विहीत मुदतीत रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि. मुंबई – ग्राहक सेवा केंद्र – १८००१०२४०८८ किंवा फोन नंबर ०२२ – ६८६२२३००५ वर संबंधीत वित्तीय संस्था बँक यांनी पाठविलेची खात्री बँक संस्था करावी व पुढील महितीसाठी वरील नंबरवर संपर्क करावा व अधिक माहितीसाठी नजीकचे गावचे कृषी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यालयाने केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअखिल महाराष्ट्र साहित्य मंच लावणी समूह यांच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण संपन्न
Next articleश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने शिरपेचात रोवला मानाचा तुरा – बी टी शिवशरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here