पंढरपूर (बारामती झटका)
कृषि क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे फळे, भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती, कडधान्य, तृणधान्य यांचे आधूनिक तंत्रज्ञानामुळे विक्रमी दर्जेदार उत्पादन येत आहे. बाजारातील मागणीपेक्षा जास्त पुरवठा यामुळे कृषि मालाचे भाव उतरत आहेत. यावर एकतर प्रक्रिया उद्योग उभा करणे किंवा निर्यातक्षम उत्पादन करणे हा होय. अन्नप्रक्रिया व कृषि माल प्रक्रिया उद्योगाला केंद्र व राज्य शासनाकडून प्रोत्साहनपर अनुदान, अर्थसहाय्य देण्याच्या योजना आहेत. परंतू उद्योग उभारणी खर्च, खेळते भांडवल, तांत्रीक मनुष्यबळ, मार्केटिग याबाबत अडचणी आहेत. उपलब्ध साधनसामुग्रीचा पर्यावरण व जीव जंतूशी मैत्रीचे ‘जीवो जीवस्य जिवनम्’ असे संबंध ठेवून पीक संरक्षक व उत्पादक औषधाचा वापर करून यांचे उर्वरीत अंश विरहीत निर्यात पॅरामीटर सह उत्पादन करणे शिवाय पर्याय नाही. यामुळे बाजारभावापेक्षा दुप्पट भाव मिळून राष्ट्राला मौल्यवान असे परकिय चलन मिळते व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. दर्जेदार उच्च प्रतिचे उत्पादनाबरोबर पीक संरक्षण व उत्पादन औषधाचे नगन्य मान्यता प्रमाणसह उर्वरीत अंश विरहीत उत्पादन पीक संरक्षक औषधाचे पी.एच.आय. इनडेक्स नुसार वापर कालावधी ठरविने सर्वात महत्वाचे आहे.
आपल्या तालुक्यातील आंबा, डाळिंब, द्राक्ष, केळी, पपई, लिंबूवर्गीय फळे, सिताफळ, पेरु, बोर व भाजीपाला यामध्ये भेंडी, मिरची, बेबी कॉर्न यांचे निर्यातक्षम उत्पादनास खुप वाव आहे. निर्यातमध्ये अग्रगण्य असणाऱ्या के.बी. एक्सपोर्ट लि. फलटन व बारामती अग्रो लि. बारामती यांचे व कृषि विभाग मंडळ नातेपुते यांचे सहकार्य, मार्गदर्शनाने भेंडी, मिरची, बेबी कॉर्न याचे गुरसाळे, पिंपरी, कारुंडे, दहीगाव, फोंडशिरस येथे निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन चालू आहे. तसेच वल्लभ गुणाजी ॲन्ड कंपनी लि. यांचे व कृषि विभाग यांचे सहकार्य व मार्गदशनाने औषधी व सुंगधी वनस्पती, दिनका राजा व कृष्ण तुळस यांचे ही उत्पादन चालू आहे. तरी कार्य क्षेत्रातील इच्छूक लाभार्थी यांनी कृषि विभाग व निर्यातदार संस्था यांचेशी संपर्क करून अधिकची माहिती व मार्गदर्शन घेण्याचे आवाहन सतीश कचरे यांनी केले आहे. निर्यातक्षम भाजीपाला व फळे नोंदणीसाठी www.hort..net.gov.in या संकेतस्थळी जाऊन द्राक्षसाठी ग्रेप नेट, डाळिंबसाठी अनार नेट, आंबासाठी – मॅगोनेट, लिंबूवर्गीय फळेसाठी सिटूस नेट, भाजीपालासाठी व्हेजनेट वर पिक नोंदसह सातबारा आठ अ आधारकार्ड पिक क्षेत्र चतुःसीमासह नकाशा व विहीत फॉर्म द्राक्ष पिकासाठी नोंदणी फी चलन सह ऑनलाईन महिती भरून क्षेत्र व पिक तपासणीसाठी मंडल कृषि अधिकारी कार्यालयाकडे सादर करावी.
या कार्यप्रणालीत अधिक माहिती व मार्गदशनासाठी नजीकचे कृषि सहायक कृषी पर्यवेक्षक व कार्यालयाशी संपर्क साधावा. हॉर्ट नेटमध्ये संबंधीत पीक निहाय निर्यातक्षम भाजीपाला व फळे उत्पादन नोंद केल्याने मान्यताप्राप्त निर्यातदार यांना नोंदणी महिती उपलब्ध होते. व निर्यातक्षम उत्पादनाला खरेदीदार सहज उपलब्ध होतो. रफीक नायकवाडी विभागीय कृषि सहसंचालक पुणे निर्यातक्षम फळे व भाजीपाला नोंदणी व उत्पादनामुळे उत्पादकाचा ग्राहकांच्या खरेदी रक्कममधील हिस्सा वाढतो. म्हणजेच आधिक भाव मिळतो – बाळासाहेब शिंदे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सोलापूर पीक संरक्षण बाबीचा पी.एच.आय. प्रमाणे नियोजन करून उर्वरीत अंश विरहीत उत्पादन घेणे सहज शक्य आहे – रविन्द्र कांबळे उप विभागीय कृषि अधिकारी पंढरपूर.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng