सातारा (बारामती झटका)
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील मराठी विभाग प्रमुख व फिनिक्स कॅम्पस फिल्म सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे यांची भारतीय स्तरावरील फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया वेस्टर्न रिजन या संस्थेच्या कार्यकारी मंडळात विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली. वेस्टर्न रिजनचे उपाध्यक्ष डॉ. सुधीर नांदगावकर यांनी प्राचार्य यांना निवडीचे पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले.
छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये २०१९-२० या शैक्षणिक वर्षात डॉ. सुभाष वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना संघटीत करून सुजाण चित्रपट प्रेक्षक तयार करण्यासाठी फिनिक्स कॅम्पस फिल्म सोसायटीची महाविद्यालयात स्थापना केली. या सोसायटीमार्फत सदस्य-विद्यार्थी व प्राध्यापक यांना चित्रपट दाखवून त्या नंतर ओपन फोरममध्ये चर्चा करण्यात येते. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया वेस्टर्न रिजन व चित्रपट संग्रहालय, पुणे आयोजित चित्रपट रसास्वाद प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होऊन डॉ. सुभाष वाघमारे यांनी प्रशिक्षण घेतले. छत्रपती शिवाजी कॉलेजने सलग तिसऱ्या वर्षीही फिनिक्स फिल्म सोसायटीचे या संस्थेशी सलग्नीकरण करून घेतले असून कोरोना काळात विद्यार्थ्यांना जगातील मूल्यविचार असलेले पुरस्कार विजेते चित्रपट दाखविण्यात येत आहेत. फेडरेशनकडून डॉ. सुभाष वाघमारे यांची पश्चिम महाराष्ट्रात विविध महाविद्यालयात कॅम्पस फिल्म सोसायटीज स्थापन करण्यासाठीची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. त्याची निवड झाल्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे संचालक प्राचार्य आर. के. शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे ऑडीटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता पाटील, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश दुकळे, छत्रपती शिवाजी कॉलेजमधील गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अनिल वावरे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng