फैसला क्या होगा वो वक़्त को मंजूर हैं लेकिन संघर्ष में कोई कमी नहीं छोड़ेंगे।

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांच्या आमदार पदावर दोन वर्षे यशस्वी वचनपुर्ती निमित्त प्रतिक जानकर यांचा लेख.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांना आमदार होऊन दोन वर्षे यशस्वी वचनपुर्ती जनतेची सेवा केली आहे.द्विवर्षपुर्ती निमित्त युवा नेते प्रतिक जानकर यांचा त्यांच्या विचारांतून तयार केलेला लेख आहे.

आज या आपल्या आमदारकी च्या द्विवर्षपूर्ती च्या निमित्ताने तुम्ही आमदार होण्याच्या आधी सांगितलेली एकच गोष्ट आठवते ती म्हणजे ही निवडणूक म्हणजे नुसती एक सत्ता घालवून दुसरी सत्ता आणण्याची राजकिय लढाई नाही,किंवा एक घराण घालवून दुसर्या घराण्याची सत्ता स्थापन करण्याचा तो संघर्ष नाही तर न्याय,निती आणि समतेच राज्य स्थापन करण्याचा तो एक यज्ञ आहे . जातीपातीच्या भिंती दुर करुन,सर्वसामान्य समाज्याच्या सर्व घटकांना बरोबर घेत कायद्यसमोर सर्व समान या तत्वांची प्रस्थापना करणारा आपला तालुका असेल.
ही वाक्य आज कुठ तरी सत्यात उतरताना दिसतायत.ही आमच्या साठी तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

सर्वसमान्य मायबाप जनतेच्या आशिर्वादाने,भारतीय जनता पार्टीच्या अगदी सामान्य कार्यकर्ता व नेता यांच्या कष्टातून आपण आमदार झालात.

“जे कार्य मी हाती घेत आहे,ते निष्ठापूर्वक पार पाडीन.”

अशी शपथ विधानभवनात आमदार या नात्याने आपण घेतलीत.आपण लोकांच्या कामाच्या जनसेवेतून ही शपथ दररोज जगण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहात.
आपण ‘निष्ठापूर्वक’ व ‘शुद्ध दृष्टीकोन’ ठेवत समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहचला पाहिजे,यासाठी आपली नेहमीच तळमळ,धडपड असते याचे आम्ही सगळे साक्षीदार आहोत.

आपल्याला माळशिरस तालुक्याचा आमदार म्हणून निवडून येवुन दोन वर्ष पुर्ण झाले. खरतर ही दोन वर्षे ‘आव्हानांची वर्ष’ होती.कोरोना,महापूर,अवकाळी पाऊस अशी मोठी संकटे आपल्यावरती आली.तरीपण या दोन वर्ष्याच्या कालावधी मध्ये आपण माळशिरस तालुक्यातील अनेक छोटे-मोठे प्रश्न आपण मार्गी लावले.विकासकामांचा डोंगर उभारायच काम आपण करताय.अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते समजा मध्ये वंचित असलेला सामान्य माणुस,तरुणवर्ग महिलावर्ग कामगारवर्ग,शेतकरी वर्ग यांचे प्रश्न आपण नेहमीच प्राधान्याने सोडवत असतात.कोरोना सारख्या महाभयंकर स्थितीत आपण तालुक्यातील अनेक कुटुंबांना आधार दिलात.तालुक्यातील मायबाप जनतेची काळजी घेतली.

बाहेर अडकलेल्या स्थलातंरीत लोकाना तालुक्यात आणण्यापासुन ते धान्यवाटप असेल किराणा किट वाटप असेल तिथपासून ते रुग्णांना बेड मिळवून देणे,इंजेक्शन मिळवून देणे आर्थिक मदत करणे,गरिब रुग्णांची बिल कमी करने ही सगळी काम आपण पार पाडलीत.
जिथ गरज आहे तिथ आक्रमक भुमिका आपण घेत असता.तालुक्यातील अनेक प्रश्न शासन दरबारी मांडून त्याबद्दल सभागृहामधे आवाज उठवत असतात.

शेतकार्याच्या वीजतोडी विरोधात आपण विधान भवन परिसरात केलल अंदोलन असेल,#MPSC च्या विद्यार्थ्यासाठी केलेल अंदोलन असेल यामुळे विद्यार्थी आणि शेतकरी यांच्यामधे तुमच्या बद्दल एक आपुलकी ची भावना निर्माण झाली आहे आपले प्रश्न मांडनारा कोणीतरी आपला माणूस सभागृहात आहे ही आपलेपणाची भावना त्यांच्या मनामधे निर्माण झाली आहे .

गेले 2-3 वर्षा मध्ये आपण राजकारण,जातपात,गटतट या सर्व गोष्टी विसरून तालुक्यातील सर्वांची काम आपण करताय.तालुक्यातील कार्यकर्ते यांच्या सुखा बरोबर आपण दुःखा मध्ये देखील आपण सहभागी असता.त्याच कारणामुळे तालुक्यातील जनतेचं आणि भाऊ तुमचं एक आपुलकीची नात निर्माण झालं.त्यामुळेच तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हृदय सिंहासनावर आपणच आहात हे मात्र नक्की. भाऊ तुमचा हा दिलदार बाणा हा कार्यकर्त्याला आपलस करून टाकतो.पद येत असतात जात असतात पण तुम्ही कधीच त्या पदाचा गर्व केला नाही. स्वभाव बदला नाही,कार्यकर्त्या वरच प्रेम नखबर कमी होऊ दिल नाही.

सेवा है यज्ञ कुंड समिधा सम हम जले

ही शिकवण राजकीय जीवनात लोकसेवेसाठी वापरताना संपूर्ण महाराष्ट्र आपणास पाहत आहे.
सामान्यातील सामन्य माणसाला,शेतकर्याला,
जनसामान्य बहुजन समाजाला तुम्ही ‘आपल’ वाटता.इथ प्रत्येकाच्या मनात विश्वास आहे रामभाऊच्या जनता दरबारात आपल्याला न्याय मिळेल आपली कामे होतिल.हाच विश्वास सर्वसामन्य जनतेचा विश्वास तुम्हाला एका वेगळ्या उंची वर नेणार आहे यात शंका नाही. – आपलाच – प्रतिक जानकर
.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleधैर्यशील मोहिते-पाटील यांचे जानकर परिवारांच्या वतीने जंगी स्वागत.
Next articleकमलाभवानी करमाळा तालुक्यातील इतर कारखान्यांपेक्षा ऊसाला जास्त दर देणार – चेअरमन विक्रमसिंह शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here