फोंडशिरस गावात संजयमामा शिंदे खासदार उमेदवार नंतर आमदार होऊनच आले.

फोंडशिरस राष्ट्रवादी काँग्रेस विचारसरणीचे पश्चिम भागांमधील गावात पैकी एक गाव आहे.


फोंडशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामधील मोठ्या ग्रामपंचायती पैकी 1 ग्रामपंचायत असणारे फोंडशिरस गावामध्ये माढा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय मामा शिंदे उभे असताना फोंडशिरस करानी संजय मामा यांचा सन्मान करून फोंडशिरस राष्ट्रवादी काँग्रेस विचारसरणीचे पश्चिम भागांमधील गावा पैकी एक गाव आहे अशा फोंडशिरस गावात संजय मामा शिंदे गावांमध्ये येत असताना आमदार होऊनच आलेले आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्यावेळी तालुक्यातील मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधी गट एकत्र येऊन भाजपचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलेले होते त्यावेळेस माळशिरस तालुक्यातून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना एक लाखापेक्षा जास्त लीड घेऊन विजयी झालेले होते.
माळशिरस तालुक्यामध्ये निष्ठावान राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या नेते व कार्यकर्ते यांनी संजय मामांना 40 हजाराच्या आसपास मतदान दिलेले होते संजय मामा लोकसभेच्या प्रचारा निमित्त गाव भेट दौऱ्याच्या वेळी फोंडशिरस येथे आली असता फोंडशिरस करांनी जंगी स्वागत केले होते त्यावेळेस उद्योजक उत्तमदादा फरतडे विश्वासू सहकारी सुरेशआबा पालवे पाटील उद्योजक शरदबापू मोरे समवेत होते त्यावेळेस वस्ताद विष्णुपंत गोरे व फोंडशिरस करांनी जंगी स्वागत केले होते. यावरून माळशिरस तालुक्यातील दोन्ही गट एकत्र होऊन भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभे राहिलेले असताना फोंडशिरस करांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहून फोंडशिरस गाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचाराची आहे हे त्यावेळेस दाखवून दिले होते आज ग्रामपंचायतीच्या 15 वा वित्त आयोगातून विकास कामांचे उद्घाटन होत असताना संजय मामा येत आहेत सध्या ते माढा करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत त्यामुळे लोकसभेचे उमेदवार असताना गाव भेट दौरा झालेला होता त्यानंतर आमदार झाल्यानंतर आलेले संजय मामा फोंडशिरस करांना काय संबोधित करतील याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची मुलुख मैदानी तोफ धडाडणार.
Next articleजगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब देहुकर महाराज, मळोली यांचे सुश्राव्य किर्तन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here