फोंडशिरस येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नव्या सरकारचे फटाके वाजवून केले स्वागत…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या शपथविधीनंतर भाजपचा जल्लोष.

फोंडशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारची उचलबांगडी झाली आणि सरकार कोसळले. सरकार कोसळल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पाठींब्यावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस गावात फटाके वाजवून आनंदाने जल्लोष करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराअध्यक्ष हरीदास वाघमोडे पाटील, समाज सेवक सुनील दाते, दत्ता गोरे, तेजस गोरे, वैभव रणदिवे, दीपक रणदिवे, विनोद गोरे, अक्षय खरात, शंकर बोडरे, नितीन मदने, विशाल गोरे, हेमंत बोडरे, खंडू शेठ शिरतोडे, अनिल इंगळे, लखन रणदिवे, दत्ता रणदिवे, सतीश शेंडे आणि इतर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष साजरा केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवेळापुरात शिवकृपा कृषी सेवा केंद्राचा धुमधडाक्यात व उत्साही वातावरणात उद्घाटन समारंभ संपन्न…
Next articleश्रीनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सन्मान…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here