सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील व विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध सोसायटीची निवड.
फोंडशिरस ( बारामती झटका )
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्री. जयसिंह मोहिते पाटील व विधान परिषदेचे आमदार श्री. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडशिरस विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. फोंडशिरस या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडलेली होती.
अकलूज सहाय्यक निबंधक संस्था कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी जी. बी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक पार पडली. चेअरमन पदासाठी श्री. श्रीराम दाते व व्हा. चेअरमन पदासाठी श्री. मनोजकुमार गांधी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. यामध्ये १) शिवाजी गोरे २) सुभाष कुचेकर ३) लक्ष्मण गोरे ४) जगन्नाथ महामुनी ५) शिवाजी कुंभार ६) गोरख वाघमोडे ७) कुंडलिक गोरे ८) संतोष दाते ९) भीमा रणदिवे १०) श्रीमती फुलाबाई वाघमोडे ११) सौ. श्रध्दा दाते आदी संचालक मंडळ उपस्थित होते.
निवडणूक कामी श्री. जी. बी. जाधव साहेब निवडणूक अधिकारी यांना संस्थेचे सचिव श्री साळुंखे भाऊसाहेब व श्री कृष्णा गोरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng