बदलापुर ते बेलापुर मार्गावर नवी मुंबई महानगरपालिकेची बस सेवा सुरु

बदलापुर (बारामती झटका) गुरुनाथ तिरपणकर यांजकडून

बदलापुर शहराचे झपाट्याने नागरीकरण होऊन प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. तसेच बदलापुर ते बेलापुर या मार्गावर आनंदनगर, अंबरनाथ, पालेगाव, खोणी, पलावा, तळोजा एमआयडीसी अशा विविध ठीकाणी गृहसंकुले होत आहेत. भविष्यात नागरीकरण होऊन लोकसंख्येत वाढ होत आहे. याची गंभीर दखल बदलापुर ते बेलापुर या बस मार्गावरुन प्रवास करणा-या प्रवाश्यांनी घेतली. तसे सह्यांचे निवेदनही त्यांनी मा. परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवा, सीबीडी, बेलापुर येथे सादर केले. त्याचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

प्रवाशांनी सातत्याने नवी मुंबई परिवहन सेवा कार्यालयात संबंधित पदाधिकारी यांच्या गाठी भेटी घेतल्या, चर्चा केली. त्यांच्या या पाठपुराव्याला यश येऊन बदलापुर-बेलापुर ही नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेची बस सेवा सुरु झाली. बऱ्याच वर्षापासून प्रवाशांची ही मागणी होती, ती पुर्ण झाली. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेची ही बस सेवा सुरु करण्यासाठी अरुण अहिरे, पोलिस आयुक्त नवी मुंबई कार्यालय, घनश्याम भाऊ, सीमा मॅडम, वैदेही मॅडम, मनिषा मॅडम, मकरंद, प्रशांत जवेरी आदी प्रवाशांनी विशेष परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleForex Club xcritical CIS: Inlägg
Next articleमांडवे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने इच्छुक उमेदवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here