बदलापूर (बारामती झटका)
प्रेरणा फाउंडेशन रजि. 564/एफ 38784/बदलापूर/ठाणे /महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचा दि. 01-06-2022 बुधवार रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत प्रेरणा फाऊंडेशन जनसंपर्क कार्यालय, शॉप नं 06, फातिमा हाईस्कूल जवळ, बेलवली, बदलापूर (वेस्ट) येथे कॉम्प्युटर प्रशिक्षण लघु केंद्राचा कार्यक्रम संपन्न झाला. ज्यांना कॉम्प्युटर चे ज्ञान नाही अश्या लोकांना आज जॉब मिळत नाही. डिजिटल युगात आज सर्व गोष्टी डिजिटल हिट आहेत.
आदिवासी मुलींना/मुलांना तसेच सर्वांना कॉम्प्युटरचे शिक्षण घेण्यासाठी “इंटेग्रेवोन मॅनेज्ड सोल्युशन” या कंपनीच्या विद्यमाने प्रेरणा फाउंडेशन, प्रेरणा प्रोडक्शन अंर्तगत, प्रेरणा एज्युकेशन इन्स्टिट्यूट कॉम्प्युटर प्रशिक्षण लघु केंद्राचा उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्षा दिप्ती (प्रेरणा) गांवकर, सचिव वैभव कुलकर्णी व चीफ इन्फॉरमेशन ऑफिसर श्री. संजीव जैन सर यांनी आयोजीत केला. सध्याचे युग हे डिजिटल झाले आहे, त्यामुळे सर्वांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रेरणा फाउंडेशन व ईंटेग्रेवोन कंपनीचा एक छोटासा प्रयत्न यशस्वी झाला.
या कार्यक्रमासाठी मा.श्री. संजीव सुरेशचंद्र जैन (इंटेग्रेवोन मॅनेज्ड सोल्युशन चीफ इन्फॉरमेशन ऑफिसर ), मा. श्री. अविनाश म्हात्रे (अध्यक्ष दीनदयाळ संस्था), मा. श्री. गुरुनाथ तिरपणकर (अध्यक्ष जनजागृती सेवा समिती), मा श्री. दिलीप नारकर सर, मा. श्री.राजेंद्र नरसाळे सर, मा. श्री. मंगेश सावंत सर, मा.श्री. प्रियुष चक्रवर्ती, पर्ल फाउंडेशनच्या मारियन डिसोझा, आरती नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिलीप नारकर, अविनाश म्हात्रे सर व सर्व मान्यवरांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. मा. श्री. संजीव सुरेशचंद्र जैन यांना प्रेरणा फाउंडेशन तर्फे “प्रेरणा प्रोत्साहन डॉ. अब्दुल कलाम पुरस्कार 2022” देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांना प्रेरणा फाउंडेशन तर्फे सस्नेह आभार प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
प्रेरणा फाउंडेशनच्या अध्यक्षा दिप्ती उर्फ प्रेरणा गांवकर यांनी प्रेरणा फाउंडेशनची माहिती देऊन सर्वांनी काळाची गरज लक्षात घेऊन शिक्षणात तसेच इतर सामाजिक, कला, सांस्कृतिक क्षेत्रात कसे पुढे यावे, याचे मुलांना मागर्दर्शन केले. तसेच श्री. संजीव जैन यांनी डिजिटल युगाचे महत्त्व सांगून आलेल्या सर्व मुलांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांनी मुलांना मागर्दर्शन केले. अविनाश सर, आणि दिलीप नारकर सर यांनी प्रेरणा फाउंडेशनला रक्कम स्वरूपात मदत केली. सचिव वैभव कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले. सभासद श्री. विनायक चांदेकर, सौ. वैशाली चांदेकर, कु. रुद्रवंशीकुमार मण्यार,मा. प्रियुष चक्रवर्ती सर, श्री. विकास पवार यांचे बहूमोलाचे सहकार्य लाभले. प्रेरणा फाउंडेशन नेहमी गोरगरिबांच्या सेवेत हजर असेल, असे आश्वासन दीप्ती ऊर्फ प्रेरणा गावकर यांनी दिले. आभार प्रदर्शन करून अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng