बदलापूर येथे रेल्वे प्रवासी संघाची प्रथम सभा

बदलापूर (बारामती झटका) गुरुनाथ तिरपणकर यांजकडून

बदलापूर शहरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी रेल्वे प्रवासी संघाच्यावतीने रविवारी दि. ७/८/२०२२ रोजी संध्याकाळी ५ वा. ध्रुव अकॅडमी, नवरत्न हाॅटेलच्या मागे, कार्तिक काॅम्प्लेक्स, बदलापूर (पूर्व) येथे प्रथम सभा आयोजित करण्यात आली आहे.

सभेमध्ये नविन कार्यकारिणी, संघटनेची उद्दिष्ट्ये, रेल्वे प्रवासी फेऱ्या वाढविणे, सुरक्षा, स्वच्छता गृह, होम प्लॅटफॉर्मचे काम युध्द पातळीवर होणेबाबत, रेल्वेच्या विविध समस्यांबाबत पत्र व्यवहार करणे, रेल्वे प्रवासी संघ व रेल्वे प्रशासन यामध्ये समन्वय राखणे व पुढील वाटचाल यावर सविस्तर चर्चा होईल. सभेस उपस्थित रेल्वे प्रवाशांनी आपल्या समस्या व उपाय यावर चर्चा करावयाची आहे. त्याकरिता रेल्वे प्रवासी संघाने आयोजित केलेल्या प्रथम सभेस बदलापूरकर रेल्वे प्रवाशांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रेल्वे प्रवासी संघाकडून करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाची १४ ऑगस्टला सर्वसाधारण सभा
Next articleवेळापूर येथे तानाजी साबळे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये घराचे स्वप्न केले साकार…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here