मुंबई (बारामती झटका)
बदलापुरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वेच्या फे-या कमी पडत आहेत. त्याच बदलापूर रेल्वे स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मचे काम संथ गतीने चालु आहे. होम प्लॅटफॉर्मचे काम, सरकते जिने, सुरक्षा यंत्रणा अशा विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच मुंबई येथील रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात बदलापूर शहर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव यांनी सादर केले.
रखडलेले होम प्लॅटफॉर्मचे काम त्वरीत सुरु करणे, प्लॅटफॉर्म नं. १ व २ मध्ये सरकते जिने, प्लॅटफॉर्मवर संपुर्ण पत्रा शेड, गर्दीच्या वेळी लोकल सेवा वाढविणे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आरपीएफ, जीआरपी यांची संख्या वाढविणे अशा विविध संदर्भातील निवेदन रेल्वे राज्यमंत्री कार्यालयातील इंजिनिअर सलीम शेख यांना बदलापूर शहर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव यांनी देऊन सविस्तर चर्चा केली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng