बनावट कागदपत्राद्वारे अस्तित्वात नसलेला प्लॉट विक्री करणाऱ्या सात जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद.

बोगस प्लॉट 28 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिडीताने गाठले पोलीस स्टेशन.

फलटण ( बारामती झटका )

बोगस कागदपञाद्वारे आस्तित्वात नसलेला प्लॉट विकून २८ लाख ६० हजार रुपयांंची फसवणूक केल्याप्रकरणी ७ जणांविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहीती अशी की, धर्मराज बाळासाहेब शिंदे (रा. भाडळी बुद्रुक ता. फलटण) यांना त्यांचे हैद्राबाद येथील नातेवाईक महादेव तुकाराम यादव यांच्यासाठी प्लॉट खरेदी करावयाचा होता त्या अनुषंगाने धर्मराज शिंदे यांंनी संजय उर्फ संजु काळे, दिनेश कसबे, सुनिल सोनवलकर, संग्राम नाळे यांना भेटले आणि प्लॉट खरेदी करण्याबाबत सांगितले. त्यावेळी त्यांनी सदरील चौघांजणांनी कोळकी येथे दहिवडी रोडला लागून असलेला प्लॉट दाखवला, सदरचा प्लॉट हा ४ गुंठे असून या प्लॉटचे मालक दुर्योधन किसन सावंत रा. मुंबई यांचा आहे. प्लॉटचे मालक दुर्योधन किसन सावंत यांनी संग्राम नाळे यांंना तो प्लॉट विक्री करिता अधिकार दिलेले आहेत असे सांगितले. तो प्लॉट शिंदे यांंनी फिर्यादी यांचे नातेवाईक महादेव यादव यांना दाखवला आणि त्या प्लॉटचा व्यवहार एकूण २८ लाख ६० हजार रुपयांना ठरला.

त्यानंतर दि. १०/०५/२०१८ रोजी दैनिकात रितसर नोटीस दिली. त्यावर कोणीही हरकत न घेतल्याने दि. २५/०५/२०१८ रोजी सहाय्यक उपनिबंधक फलटण यांचे कार्यालयात दस्त क्र. ११०९/२०१८ अन्वये नोंदवात आला. त्यावेळी संग्राम नाळे यांचे खातेवर ७ लाख ५० हजार रूपये व सुनिल सोनवलकर यांचे नावावर ७ लाख ५० हजार रुपये असे एकूण १५ लाख रुपयेचे महाराष्ट्र बँक शाखा फलटण मधील खात्यावर आरटीजीएस ने राहिलेले १३ लाख ६० हजार रुपये रोख स्वरूपात असे एकूण २८ लाख ६० हजार रुपये देवून सदरचा व्यवहार पुर्ण केला.

त्यानंतर आम्ही प्लॉटला कंपाऊंड करत असताना, तो प्लॉट दुसऱ्याचा असल्याचे समजल्यानंतर संजु काळे, दिनेश कसबे, सुनिल सोनवलकर, संग्राम नाळे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर दुसरा प्लॉट देण्याचे आश्वासन दिले. परंतु, त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी तो प्लॉट दुस-या व्यक्तीला विकला. यातील एकूण सात संशयितांनी वाटणीचे येणारे पैसे देण्याचे नोटरीने कबूल केले होते. दरम्यान फिर्यादी यांनी संबंधितांना याबाबत विचारणा केली असता टप्याटप्याने १० लाख ५० हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर फिर्यादी यांनी याप्रकरणी दुर्योधन किसन सावंत (रा.मुंबई), सुनील दादासो सोनवलकर (रा. वडले), संग्राम धनाजी नाळे (रा.कोळकी), संजय वसंत उर्फ संजु काळे (रा.कोळकी), दीपक शिवाजी साळुंखे (रा.कोळकी), दिनेश निवृत्ती कसबे (रा.कोळकी), सागर संजय काकडे (रा.कोळकी) अशा सात जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन राऊळ करीत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाणसातील देव माणसाला वाढदिवसानिमित्त लहानथोर मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव.
Next article“असून अडचण नसून खोळंबा” असे नीरा उजवा कालव्याच्या उप फाट्यावरील पुलाची अवस्था…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here