बहुजन पत्रकार संघ व रोखठोक न्यूजच्या चौथा वर्धापन दिनानिमित्त गुणीजन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)

बहुजन पत्रकार संघ व रोखठोक न्यूजच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक, सहकार, उद्योग, कृषी, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गुणीजन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन बुधवार दि. २६/४/२०२३ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुडूस निसर्ग पर्यटन केंद्र खुडूस, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी माळशिरस विभाग अकलूजचे डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार विविध मान्यवरांना देण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे, वनपरिक्षेत्र अधिकारी माळशिरसचे दयानंद कोकरे, माळशिरस तालुका कृषी अधिकारी सौ. पुनम चव्हाण हे असणार आहेत.

तसेच अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अकलूज शहर पोलीस स्टेशनचे सुनील जाधव, वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, पिलीव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माळप्पा पुजारी, नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रोखठोक न्यूज यूट्यूब चॅनेलचे संपादक मकरंद साठे आणि बहुजन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष बंडू कांबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleतिरवंडी येथे वाघमोडे परिवाराच्यावतीने जागरण गोंधळ व जावळ कार्यक्रमाचे आयोजन
Next articleनातेपुते येथे पांढरे पाटील परिवाराच्या वतीने जागरण व गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here