बहुजन समाजातील सर्वांनीच इतर पारायण करण्यापेक्षा क्रांतिकारी महामानवाचे कर्तुत्वाची पारायण करावित – पुरुषोत्तम खेडेकर


अकलूज (बारामती झटका)

दिनांक सात मार्च रोजी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम जी खेडेकर हे जनसंवाद यात्रेनिमित्त मौजे अकलूज येथे आले असता वरील उद्गार काढले. बहुजनांचे कल्याणाकरता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, विद्येची देवता सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे आदी महामानवाने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील बहुजन समाजाच्या हितासाठी आपल्या कर्तृत्वातून फार मोठे योगदान दिल्याचे संस्थापक अध्यक्ष खेडेकर साहेब यांनी सांगितले. या संवाद यात्रेनिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असताना वरील सर्वच महामानवांच्या कार्याचा आढावा घेतला. बहुजन समाजातील इतर देवदेवतांची पारायण करण्यापेक्षा राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,अहिल्याबाई होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आदी महामानवाच्या कार्याची पुस्तके वाचून त्यांचे कार्य बहुजन समाजातील सामान्य जनतेसमोर ठेवून समाज एकत्रित करण्याचे व सर्वच महामानवाचा खरा इतिहास तळागाळातील जनतेसमोर ठेवावा असे आव्हान त्यांनी केले.


सदर दौऱ्यात प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे साहेब, मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने शेंडगे, पुणे विभागीय कार्याध्यक्ष रवींद्र पवार, मराठा सेवा संघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष तात्यासाहेब पाटील, सोलापूर जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मीनाक्षी जगदाळे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ रामचंद्र मोहिते, संभाजी ब्रिगेडचे माळशिरस तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळ, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सौ मानोरामा लावंड मॅडम, माजी अध्यक्ष वनिता कोरटकर, तालुका कार्याध्यक्ष निनाद पाटील, संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल माने, अजित माने,डॉ विश्वास कदम डॉ भोसले, डॉ विठ्ठल कोडग, डॉ बापू सणस, सौ शमा जगताप, माळशिरस,करमाळा,पंढरपूर, या तालुक्याचे सेवा संघाचे संभाजी ब्रिगेडचे सर्व तालुका कार्यकारिणी सदस्य, अकलूज शहर विभागातील जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी, बहुजन समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सदर संवाद यात्रेत माननीय अर्जुन तनपुरे साहेब, उत्तमराव माने,तात्यासाहेब पाटील, निनाद पाटील आदींनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले सदर संवाद यात्रेचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे तालुका सचिव राजेंद्र मिसाळ यांनी करून कार्याध्यक्ष निनाद पाटील यांनी आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleविकासरत्न विजय दादांच्या वाटेवरून माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची दमदार वाटचाल सुरू आहे.
Next articleसोलापूर जिल्ह्यात अन माळशिरस तालुक्यात आजवर कधीच एवढा मोठा वाढदिवस कोणाचा झाला नाही पुढे कुणाचा होईल की नाही शक्यता नाही – समाजभूषण सुरेश शेंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here