बाजरी प्रकल्पाअंतर्गत विस्तार कार्यक्रम, शास्त्रज्ञ भेट, शिवार फेरी व क्षेत्र दिन प्रशिक्षण संपन्न…

नातेपुते (बारामती झटका)

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यक्षेत्रातील कोथळे, मोरोची, गुरसाळे, शिवारवस्ती, फडतरी, लोणंद, पिरळे व पळसमंडळ येथे राबविण्यात आलेल्या १५० हे. क्षेत्रावरील बाजरी प्रकल्प अंतर्गत विस्तार कार्यक्रमचा एक भाग म्हणून दि. १६ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर रोजी वरील प्रत्येक गावात कृषि विज्ञान केंद्र मोहोळ येथील शास्त्रज्ञ व विषय तज्ञ सौ. काजल माहत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शास्त्रज्ञ भेट, शिवार फेरी व क्षेत्र दिन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन झाले होते.

या प्रत्येक गावात शास्त्रज्ञ भेट, शिवार फेरी व क्षेत्रदिन प्रशिक्षण कार्यक्रमात शास्त्रज्ञ व विषयतज्ञ सौ. काजल माहत्रे यांनी बाजरी काढणी, साठवणूकीतील कीड रोग व बाजरी मुल्यवर्धनबाबत, श्री सतिश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी यांनी बाजरीनंतर कडधान्य हरभरा प्रकल्प बाबत श्री. लालासाहेब माने कृस यांनी बाजरी व आहारातील महत्वाबाबत, श्री. विजय कर्णे कृस यांनी बाजरी काणी रोग व त्याचे मनुष्य व पशुधनावरील परिणाम बाबत श्री अमित गोरे कृस यांनी पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग व बहूधान्य बाबत श्री. गोरख पांढरे कृप फेरोमेन ट्रप्स व बाजरीनंतर मका पिकातील वापर बाबत ८ गावातील ८ शास्त्रज्ञ भेट, शिवार फेरी व क्षेत्र दिन प्रशिक्षणात मार्गदर्शन केले व माहिती दिली.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. उदय साळुंखे कृप यांनी केले होते व गावचे कृषि मित्र तसेच रणजीत नाळे कृस श्री. नवनाथ गोरे ,कृस कु. मिरा दडस, कृस श्री. सचीन दिडके कृस यांनी नियोजन व अभार प्रदर्शन केले व चहा नाष्ट्याने सांगता झाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते येथील डॉ. बाळकृष्ण दाते प्रशालेच्या शिरपेचामध्ये शिक्षक संजय पवार यांनी रोवला मानाचा तुरा.
Next articleरामराजे यांना जलजीवन योजनेचे भूमिपूजन करताना लाज कशी वाटत नाही ? – खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here