बारामतीत महिला रुग्णालयात “कवच कुंडल अभियान” 75 तास सलग लसीकरण

बारामती (बारामती झटका) 

बारामती तालुक्यात ‘मिशन कवच कुंडल’ अभियानांतर्गत दि. 14 ऑक्टोबरपर्यंत कोविड लसीकरण करण्यात येणार असून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी निमित्त बारामतीतील महिला रुग्णालय येथे दि, 14 ऑक्टोबर दुपारी 12 वाजेपर्यंत सलग 75 तास कोविड लसीकरण सुरू राहणार आहे.

कवच कुंडल अभियानांतर्गत अठरा वर्षावरील सर्वांना पहिली मात्रा आणि पहिली मात्रा घेतली असल्यास दुसरी मात्रा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपले आधार कार्ड आणि भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन कोविड -19 लसीकरणाचा लाभ घ्यावा. ही मोहिम सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व बारामती शहरातील वेगवेगळ्या लसीकरण केंद्रावर सुरू आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्वेरीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागामध्ये एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Next articleशिक्षण प्रसारक मंडळाचे नूतन अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा मळोलीकरांच्यावतीने सन्मान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here