बारामती झटका वृत्ताचा भुमी अभिलेख कार्यालयाला झटका, अधिकाऱ्यांनी झटक्यात हद्दी खुणा करून दिल्या – भाजप चिटणीस हनुमंत कर्चे.

पिंपरी गावच्या भुईवस्ती ते हनुमंत कर्चे, नाथा कर्चे, व कर्चे मेजर ते हरणटेक रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मिटणार.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका चिटणीस पिंपरी गावचे नेते हनुमंत श्रीरंग कर्चे यांनी गट नंबर 308 मधील मोजणी हद्द फिक्स करण्यासाठी दि. 05/02/2022 पर्यंतची मुदत दिलेली होती. अन्यथा माळशिरस येथील भुमिअभिलेख कार्यालयासमोर रात्रंदिवस बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. हनुमंत श्रीरंग कर्चे यांनी गट नंबर 308 हा जगन्नाथ कोंडीबा कर्चे यांचा आहे. त्यांनी मोजणीसाठी अर्ज केलेला होता. त्या गटाची मोजणी पाच महिन्यापूर्वी झालेली होती, तरीसुद्धा भूमि अभिलेख कार्यालयाची डोळेझाक होती. सदरची बातमी बारामती झटका वेब पोर्टलमध्ये प्रसारित करून दिल्यानंतर बारामती झटका वृत्ताचा भुमी अभिलेख कार्यालयाला झटका बसलेला असल्याने अधिकाऱ्यांनी झटक्यात हद्दी खुणा करून दिल्या असल्याने माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस हनुमंत कर्चे यांनी बारामती झटका वृत्तामुळे आंदोलनाला यश आल्याने हात उंचावून आनंद व्यक्त केला व बारामती झटका परिवाराचे अभिनंदन केले.

पिंपरी गावच्या अनेक दिवसाच्या रस्त्याच्या प्रलंबित प्रश्नाला वाचा फुटलेली आहे. जगन्नाथ कोंडीबा कर्चे यांच्या 308 गटावर अद्यापपर्यंत हद्दी खुणा केलेल्या नाहीत, त्यामुळे सदर गटातील अडचणी आहेत. सदर गटातून रस्ता जाणार आहे, त्यामुळे हद्दी खुणा फिक्स नसल्यामुळे रस्त्याची कामे खोळंबलेली आहे. त्यामुळे हनुमंत कर्चे यांनी वारंवार ऑफिसला चौकशी केली, पाठपुरावा केला. तरीसुद्धा उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. सदरच्या गटातील हद्दी खुणा करणे महत्त्वाची आहे. कारण भुईवस्ती लगत पिंपरी कर्चेवाडी रस्ता आहे. भूईवस्ती ते हनुमंत कर्चे नाथा कर्चे, कर्चे मेजर ते हरण टेक रस्ता मेन रोड शिंगणापूर येथे येणारा रस्ता रोजगार हमी योजनेतून चालू आहे. परंतु, सदरच्या गटाच्या हद्दी खुणा व्हाव्यात म्हणून जगन्नाथ कोंडीबा कर्चे सोमनाथ सदाशिव खर्चे यांनी गट नंबर 308 मधील हद्दी खुणासाठी अर्ज केलेला होता. भुमिअभिलेख कार्यालयाकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात होता. त्यामुळे सदरच्या रस्त्याचे काम बंद आहे यासाठी तातडीने भूमी अभिलेख कार्यालयाने कराव्यात. अन्यथा भूमिअभिलेख कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी चिटणीस हनुमंत श्रीरंग कर्चे यांनी देऊन सदर अर्जाच्या प्रती तहसील कार्यालय माळशिरस पंचायत समिती माळशिरस यांना दिलेल्या आहेत. अशी बातमी प्रसारित करून संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, संबंधित मंत्रालयीन खात्यातील अधिकारी त्यांच्यापर्यंत गेलेली असल्याने प्रशासनाची सूत्रे वेगाने हालून गावचा कायमचा रस्त्यांचा प्रश्न मिटला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धनगरांची मानाची काठी व घोंगडी देऊन केला माळशिरसच्या नगरसेविका रेश्मा टेळे यांनी सत्कार
Next articleजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची सुरुवात गणेश जयंती दिवसाचा मुहूर्त.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here