बारामती येथील महिला रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिर संपन्न

बारामती (बारामती झटका)

पुणे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असल्याने  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख पुणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतुन  जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये एकाच दिवशी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  याचाच एक भाग म्हणून प्रादेशिक रक्त केंद्र बै.ज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या मार्फत आज बारामती शहरात महिला रुग्णालय, येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

            शिबीराचे उद्घाटन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे,  तहसिलदार विजय पाटील, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने,  ग्रामिण रुग्णालय रुईचे डॉ. सुनिल दराडे, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील रक्त पेढी प्रमुख डॉ. सोमनाथ खेडकर, रक्त संकलन अधिकारी डॉ. गौरव देखमुख, समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण बर्डे रेसिडेंट डॉक्टर डॉ. अनामिका सोमावार, डॉ. स्मिता गवळी व तंत्रज्ञ, सहायक, बीपीएमटी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

            रक्तदान शिबीरास बारामती तालुक्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या व्यक्तिस सामायिक स्वैच्छिक रक्तदान कार्ड देण्यात आले.  रक्तदान शिबीरात 92 इतक्या रक्ताच्या पिशव्या संकलित करण्यात आल्या.

पोलीस प्रशासनाकडूनही रक्तदान शिबीर संपन्न

            वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन व पणदरे, सोमेश्वरनगर, सुपे दुरक्षेत्रे तसेच पोलीस मदत केंद्र मोरगाव, या ठिकाणीही आज रक्तदान शिबीर पार पडले. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व पणदरे दुरक्षेत्र येथील रक्तदान शिबीराचे उद्धाटन अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते पार पडले.  मोरगाव, सोमेश्वर नगर व सुपे येथील उद्धाटन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, गट विकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे आदी उपस्थित होते.

या पाचही ठिकाणी उत्स्फुर्त  प्रतिसाद मिळाला असून वडगाव निंबाळकर येथे 300, पणदरे 200, सोमेश्वरनगर 200, सुपे 225 व मोरगाव येथे 150  रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवाघोलीची १००% लसीकरणाकडे वाटचाल
Next articleमाळशिरस तालुक्यातील फोंडशिरसला 93 लाख तर उंबरे दहेगावला 24 लाख रुपयाचा निधी जनसुविधा योजनेमधून मंजूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here