बारामती (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, श्री. पवार यांनी आज मौजे कन्हेरी येथील बारामती तालुका फळ रोपवाटीका, कन्हेरी गावठान येथील रस्त्यांचे काम, पंचायत समितीच्या नवीन इमारत, तीन हत्ती चौक येथील कॅनलवरील ब्रीज, ख्रिश्चन कॉलनी येथील कॅनलवरील पुलाचे सुरू असलेल्या कामांची कामाची पाहणी केली.
यावेळी एकात्मिक विकास समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng