बारामती येथे संजय गांधी निराधार योजनेची 207 प्रकरणे मंजूर

बारामती (बारामती झटका) 

संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी 6 ऑक्टोबर  2021 प्रशासकीय भवन बारामती येथे झालेल्या बैठकीत 207 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत तहसिलदार विजय पाटील, नायब तहसिलदार महादेव भोसले, समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, शिवराज माने, शहाजी दळवी, लालासो होळकर, निलेश मदने, अशोकराव इंगुले आदी उपस्थित होते.

बैठकीत एकूण 218 अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये संजय गांधी योजनेच्या 141 प्राप्त अर्जापैकी 138 मंजूर तर 3 अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे 67 प्राप्त अर्जापैकी 59 अर्ज मंजूर तर 8 अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेच्या प्राप्त 7 अर्जापैकी 7 अर्ज मंजूर करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब योजनेचे सर्व 3 अर्ज मंजूर करण्यात आले. बारामती तालुक्यातील एकुण 10 हजार 317 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर एकुण 1 कोटी 85 लाख 48 हजार 900 रुपये जमा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली आहे.

Previous articleतात्यांनी सर्वसामान्य कुटुंबातून येवून तालुक्यात विश्व निर्माण केलं – उत्तमराव जानकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य, राष्ट्रवादीचे नेते
Next articleदिसेल तिथे किरीट सोमय्यांचे थोबाड रंगवणार – मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश भैय्या डोंगरे यांचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here