बारामती विधानसभा मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम तारखा जाहीर

बारामती (बारामती झटका)

मा.भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम निर्धारीत केला आहे. सदर पुनरिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दि. 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती, नाव वगळणी केली जाणार आहे. सर्व मतदारांनी त्यांचे मतदार यादीत नाव असलेची खात्री करावी. जर यादीत नाव नसेल तर आपण वास्तव्य करीत असलेल्या भागासाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे ते आपण मतदान करीत असलेल्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. मतदार नोंदणीकरीता अर्ज मोहिमेच्या तारखांना 13, 14, 27 व 28 नोव्हेंबर या दिवशी नेमूण दिलेल्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

जास्तीत जास्त मतदारांनी नाव नोंदणी अर्ज दाखल करावेत. असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.  ऑनलाईन नाव नोंदणी nvsp.portal किंवा voter helpline app वर उपलब्ध आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबारामती येथे ऊस खोडवा उत्पादन व ऊस पाचट व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
Next articleदिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करा – राज्यमंत्री दतात्रय भरणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here