बालवयात गरुड भरारी, मांडव्याचा विराज पालवे याने प्रोॲक्टीव ॲबॅकस नॅशनल कॉम्पीटीशनमध्ये देशात पाचवा क्रमांक मिळवून ट्रॉफीचा मानकरी ठरला

सहा मिनिटात शंभर गणिते सोडवून देशाचे नाव रोशन केले

माळशिरस (बारामती झटका) शौकत पठाण यांजकडून

विराज रामदास पालवे (वय ६ वर्षे) याने नुकत्याच पार पडलेल्या Proactive Abacus National competition 2023, Pune येथे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा, कर्नाटक , गुजरातसह अनेक देशातून आलेल्या दोन हजार दोनशे तीन विद्यार्थ्यांमधून सांजदिप अकॅडमीतून 20 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, त्यात कु. विराज रामदास पालवे हा देशात 5 वा क्रमांक मिळवून ट्रॉफीचा मानकरी ठरला. प्रोॲक्टीव ॲबॅकस नॅशनल कॉम्पीटीशनमध्ये सहा मिनिटात शंभर गणिते सोडवून देशात पाचवा क्रमांक मिळविला आहे.

‘Most Energetic Center’ या पुरस्काराने सांजदिप अकॅडमीला सन्मानित करणेत आले. विराज रामदास पालवे याला संजना घोदे मॅडम व अस्मिता बाबर मॅडम या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तर विराजचे वडील रामदास पालवे व आई तनुजा पालवे यांनी परिश्रम घेऊन विराज याने देशात पाचवा क्रमांक मिळवून देशाचे नाव उज्वल केले आहे. माळशिरस तालुक्यातून विराज रामदास पालवे याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचा माळशिरस तालुक्यातील युवकांच्यावतीने सन्मान संपन्न
Next articleमाझी चूक नसताना मला मानसिक त्रास कशासाठी, मी महिला ग्रामसेविका आहे म्हणून का ? – शीला साळवे, ग्रामसेविका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here