सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची चौथी पिढी सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या रूपाने राजकारण व समाजकार्यात सक्रिय झाली….
अकलूज ( बारामती झटका )
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांचे नातू अशी ओळख असणारे सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील कर्तुत्वातून आपले नेतृत्व सिद्ध करतील, अशा सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केलेली आहे. यावरून त्यांच्या कार्याचा ठसा उमटत आहे. माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची चौथी पिढी सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या रूपाने राजकारण व समाजकार्यात सक्रिय झालेली आहे.
शंकरनगर, अकलूज येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, कर्मवीर बाबासाहेब माने पाटील व धर्मवीर सदाशिवराव माने पाटील या तीन विभूतींच्या स्मरणार्थ त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन गेले अनेक वर्ष सुरू आहे. यंदाच्या वर्षी त्रिमूर्ती केसरी स्पर्धेत सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या नियोजनामध्ये त्रिमूर्ती केसरी स्पर्धा पार पडलेली आहे. अतिशय नेटकं व नियोजनबद्ध कुस्तीचा आखाडा यशस्वीपणे पार पडलेला आहे. मोहिते पाटील परिवारामध्ये जयसिंह मोहिते पाटील यांचे कार्यक्रम व समारंभ यशस्वी करण्यामध्ये हातकंडा आहे. बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली सयाजीराजे यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील व प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कुमारी स्वरूपाराणी मोहिते पाटील उर्फ दीदी यांच्या सहकार्याने सयाजीराजे यांची राजकारण व समाजकारण कार्यातून घोडदौड सुरू आहे. मोहिते पाटील घराण्याला सहकार महर्षी यांनी घालून दिलेला आदर्श, समाजातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे कार्य यांचाच वसा आणि वारसा घेऊन चौथ्या पिढीतील सयाजीराजे मोहिते पाटील कार्य कर्तृत्वातून आपले नेतृत्व सिद्ध करतील, असे त्रिमूर्ती कुस्ती स्पर्धेतील नियोजनावरून वाटत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng