बाळासाहेबांची शिवसेना ग्रामपंचायत निवडणुकीत अस्तित्व दाखवणार – शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश चिवटे

करमाळा ( बारामती झटका )

करमाळा तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार स्थानिक पातळीवर युती करून निवडणुका लढवत असून ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडून येणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना कटिबद्ध असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केला आहे.

30 ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवत असलेले उमेदवारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रचारात सहभागी होण्यास सुरुवात केली आहे.

ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार यासाठी प्रचारसभा सुद्धा घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना चिवटे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक पातळीवरची परिस्थिती बघून लढवल्या जातात अनेक ठिकाणी बागल गट, नारायण पाटील गट, काही ठिकाणी तर संजयमामा शिंदे गटाशी स्थानिक पातळी कार्यकर्त्यांनी युती केली आहे. पण, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी तालुका पातळीवरून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. शिवाय त्या गावातील प्रश्न सोडवण्यासाठी थेट त्या गावातील निवडून येणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना मुख्यमंत्र्यांची गाठभेट घालून देणार आहे.

मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक बाळासाहेबांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय आठवले गट, रासप महादेव जानकर गट, प्रहार संघटना बच्चू कडू गट, या माहितीतील सर्व गट एकत्रित येऊन संपूर्ण ताकतीने लढवणार आहे.

ढाल तलवार चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवणार – जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत ढाल तलवार या चिन्हावर निवडणुका लढवल्या जाणार आहेत. गट तट राजकारणाला फाटा देऊन पक्षीय राजकारणाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी फक्त महायुतीतील सर्व घटक पक्षाचे नेते व कार्यकर्ते काम करणार असल्याचे सांगितले.
लवकरच महायुतीच्या सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे शेवटी चिवटे यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसंघर्ष योद्धा “आपला माणूस” आ. राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त विशेषांक प्रकाशित होणार
Next articleचि. पंकज एकतपुरे चौंडेश्वरवाडी अकलूज आणि चि.सौ.कां. अश्विनी गोरे फोंडशिरस यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here