बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन

माळशिरस तालुक्यात एमआयडीसी मंजूर करण्याबाबत राजकुमार हिवरकर पाटील यांचे दिले निवेदन

माळशिरस (बारामती झटका)

बाळासाहेबांची शिवसेनेचे माळशिरस तालुका प्रमुख तसेच महात्मा फुले समता परिषद माळशिरस तालुका अध्यक्ष राजकुमार शंकरराव हिवरकर पाटील यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना माळशिरस तालुक्यात एमआयडीसी मंजूर करण्याबाबत निवेदन दिले आहे.

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, माळशिरस तालुका हा एकूण चार जिल्ह्यांच्या सीमेवर असून हे चारही जिल्हे सोलापूर, पुणे, सातारा आणि सांगली १५० ते १८० किलोमीटर अंतरावर आहेत. माळशिरस तालुक्यात चांगल्या शिक्षण संस्था आहेत. पण, येथे शिक्षण घेऊन मुलामुलींना नोकरीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच ज्या ठिकाणी मोठमोठ्या एमआयडीसी किंवा कंपनी आहेत अशा ठिकाणी जावे लागते. म्हणून माळशिरस तालुक्यात एमआयडीसी मंजूर करण्यात यावी आणि हे फक्त आपलेच सरकार करू शकते.

नुकतेच आपल्या सरकारने माळशिरस तालुक्यासाठी वर्षानुवर्षे रखडलेली नीरा-देवधर योजना जी तालुक्यातील २२ गावांसाठी शेती पाणीसाठी लागणारी योजना होती ती मंजूर केली. तसेच वर्षानुवर्षे रखडलेली फलटण-पंढरपूर रेल्वे माळशिरसमधून धावणार आहे. त्याचप्रमाणे माळशिरस तालुक्यात आपल्या सरकारकडून लवकरात लवकर एमआयडीसी मंजूर करावी, अशी अपेक्षा या निवेदनात करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसद्गुरू श्री श्री साखर कारखान्याच्या शिरपेचात राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरीच्या रुपाने मानाचा तुरा
Next articleमहिला तणावमुक्त असतील तरच, महिलांचे आरोग्य मजबूत राहील – प्रा. शिवाजीराव सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here