बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेस राजीनामा म्हणजे घोड्यावरून पडले आणि रस्त्यावर रुसले…


अहमदनगर (बारामती झटका)

अहमदनगर जिल्ह्यातील सहकार, उद्योग, कृषी, शैक्षणिक तसेच राजकीय, सामाजिक वजनदार घराणे व काँग्रेस पक्षाशी कायम एकनिष्ठ, तत्वनिष्ठ, प्रामाणिक असलेले भाऊसाहेब थोरात घराण्याची जवळपास शंभर वर्षाची सोबत वाटचाल काँग्रेस बरोबर राहिली आहे. एक सुसंस्कृत, मितभाषी, जबाबदार नेतृत्व व महाराष्ट्राच्या राजकारणातील मात्तबर ओळख असलेले बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय सर्वांना आश्चर्यचकित करणारा व बुचकळ्यात टाकणारा आहे. नाशिक पदवीधर मतदार संघातून त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांना उमेदवारी देताना काही गडबड व अन्याय झाला, असा आरोप वा समज त्यांनी करुन घेतला आहे, असे दिसते. परंतु तांबे यांनीही काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे, हे माहित असतानाही ते नक्की कसे लढणार, कोणाची साथ घेणार, हे शेवटपर्यंत स्पष्ट सांगत नव्हते.

भाजपचे वरिष्ठ नेते उघड बोलत होते. ते आमच्याबरोबर आले तर भाजपचा उमेदवार दिला जाणार नाही, तसा शब्द त्यांनी पाळलाही. काँग्रेस पक्षाने उमेदवारी भरताना तांबे यांना दिलेले एबी फॉर्म त्यांना दिले ते काळजीपूर्वक तपासण्याची जबाबदारी सत्यजित यांची नाही का. त्यात पुन्हा या प्रक्रियेत निवडणुकीत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात शांत व गप्प का होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेसची भूमिका, पक्षाचा अजेंडा राबवण्यात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट बजावली आहे. दरम्यान त्या घडामोडी, छुपी वाटचाल, भाजपशी जवळीक या बाबी लपून राहिल्या नाहीत. त्यामुळे नाना पटोले यावर उघड नाराजी व्यक्त करत होते. मात्र, तरीही निवडणूक होईपर्यंत, निवडून येईपर्यंत बाळासाहेब थोरात मूग गिळून गप्प का होते. सत्यजित तांबे निवडून आले आणि त्यानंतर मामा भाच्यांना आता काँग्रेस विरोधी व नाना पटोले विरोधात कंठ का फुटला आहे, म्हणजे असे झाले घोड्यावरून पडायचे आणि रस्त्यावर रुसायचे.

कदाचित मामा-भाच्यांनी भाजपशी संधान बांधून येत्या काही कालावधीत भाजपमध्ये जायचा तर निर्णय त्यांच्या मनात नसावा. यातील सत्यता, कोण चुकते, कोणाचे बरोबर आहे, हे महाराष्ट्रातील लोक चांगले ओळखून आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाझी चूक नसताना मला मानसिक त्रास कशासाठी, मी महिला ग्रामसेविका आहे म्हणून का ? – शीला साळवे, ग्रामसेविका
Next articleमेडद गावच्या आदित्य रघुनाथ राऊत या विद्यार्थ्याचे जी मेन्स एक्झाम 2023 परीक्षेत घवघवीत यश.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here