गुरसाळे ( बारामती झटका )
गुरसाळे तालुका माळशिरस येथील माझे क्षेत्रातून बेकायदेशीर रस्ता काढू नये व दहिगाव मंडल अधिकारी प्रवीण सूळ यांचेवर कायदेशीर कारवाई करावी असे संतोष माणिकराव पाटील राहणार गुरसाळे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर, उपविभागीय अधिकारी अकलूज विभाग अकलूज यांना निवेदन दिलेले असून सदर निवेदनाची प्रत तहसील कार्यालय माळशिरस येथे तहसीलदार यांच्याकडे दिलेली आहे.
श्री संतोष माणिकराव पाटील रा. गुरसाळे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये कायमस्वरूपी गुरसाळे गावचा रहिवासी असून शेती व्यवसाय करून माझा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो गुरसाळे येथे जमीन गट क्रमांक 659, 660, 661 या जमिनीतून जबरदस्तीने आत्मदहनाचा इशारा देऊन दत्तात्रय शेळके ,लहू मोरे ,तुकाराम गायकवाड, रामचंद्र गायकवाड, विशाल सावंत युवराज गायकवाड हे राजकीय पुढारी दांडगावाने रस्ता काढण्याच्या प्रयत्नात आहेत वास्तविक सदर रस्ता हा कायदेशीर बाबींची पूर्तता करून काढणे आवश्यक आहे व गरजेचे आहे परंतु वरील राजकीय पुढारी राजकीय वजन वापरून बेकायदेशीरपणे प्रशासनाला वेठीस धरून रस्ता काढू पाहत आहेत त्याचाच एक भाग म्हणून यातील मौजे दहेगाव मंडलाधिकारी हे देखील बेकायदेशीर लाच रक्कम स्वीकारून माझे परस्पर माझ्या जमिनीत मध्ये येऊन मला पूर्व नोटीस न देता खोटा व बनावट पंचनामा करून गेले आहेत त्यासंदर्भात मी त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये विचारणा करण्यासाठी गेलो असता मला शासकीय कामात अडथळा करतो तुला खोट्या केस मध्ये अडकून जेलमध्ये टाकीन असे म्हणून धमकी दिलेली आहे. त्याबाबत मी नातेपुते पोलीस स्टेशन येथे एनसीसी नंबर 20/ 2022 तारीख 12/ 1/20 22 रोजी दाखल केली आहे म्हणून सदर विनंती अर्जाद्वारे माझी आपणास विनंती आहे मौजे दहिगाव मंडलाधिकारी प्रवीण सुळ यांचेवर कडक कारवाई करावी तसेच माझे वर नमूद जमिनीतून बेकायदेशीरपणे दांडगावाने राजकीय पुढाऱ्याच्या दबावाला बळी पडून कोणताही रस्ता काढू नये अशाप्रकारे अर्ज दिलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng