पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपअधीक्षक बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या सहकार्याने पोलीस हवालदार संतोष घोगरे यांची धडाकेबाज कामगिरी
माळशिरस ( बारामती झटका )
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी उपअधीक्षक बसवराज शिवपुजे, यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या सहकार्याने तपासी अंमलदार पोलीस हवलदार संतोष तुकाराम घोगरे यांनी दमदार धडाकेबाज कामगिरी बजावून टिपर चालक धनाजी उर्फ विश्वनाथ शिंदे रा. सदाशिवनगर, अरिफ मोहम्मद शेख रा. पुरंदावडे, अविनाश संजय वाघमोडे रा. जाधववाडी, शंकर उर्फ शाखा उर्फ दत्तात्रय कर्चे रा. पिंपरी यांच्यावर भा.द.वि.स. कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करून गुन्ह्यातील तीन आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळविलेली आहे.
माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विनायक राजेंद्र चौगुले यांनी माळशिरस पोलीस स्टेशन येथे वरील चार आरोपींच्या नावे 35 लाख रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा टिपर ( हायवा ) त्यावर आरटीओ पासिंग नसलेला असा टिपर 42 हजार किमतीची 6 ब्रास वाळू भरलेली शासनाचा कोणताही पास, परवाना न घेता सदर वाळूची चोरी करून चोरटी वाहतूक केली आहे, असा गुन्हा नोंद केलेला होता. सदर गुन्ह्यातील तीन आरोपिंना दि. 15/05/2022 रोजी अटक करून माननीय हुजुर कोर्टाचे समोर उभे करून दोन दिवसाचे पोलिस कस्टडी मंजूर केलेली होती. सदर पोलिस कस्टडीची मुदत 18/05/2022 रोजी संपत असल्याने तपासी अंमलदार पोलीस हवालदार संतोष घोगरे पोलिस कस्टडीतील आरोपिंना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सो. कोर्ट पंढरपूर यांच्याकडे हजर करून 14 दिवसाची न्यायालयीन कस्टडी मागणार आहेत. सदर गुन्ह्याचा तपास चालू असून गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध पुरावा उपलब्ध करून सदर आरोपी विरुद्ध माननीय हुजुर कोर्टात दोषारोप पत्र दाखल करावयाचे असल्याने सदर आरोपींना आजपासून पुढील चौदा दिवस न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर होऊन मिळावे व चौथा आरोपीला अटक करणे सोयीस्कर होईल. आज पंढरपूर न्यायालयात तीन आरोपी यांना घेऊन गेलेले आहेत.
माळशिरस तालुक्यात अवैध वाळू उपसा व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तस्करांवर पोलीस उपाधीक्षक बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केलेले आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांच्या लवकरच मुसक्या आवळल्या जाणार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng