बोंडले विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा धुराळा उडवून सुपडा साफ…

काळजीवाहू चेअरमन संतोषकुमार देशमुख व व्हाईस चेअरमन रवींद्र डोंगरे यांच्यासह अनेक नेत्यांचा दारुण पराभव

ह‌.भ.प. वै. बाळू पाटील परिवर्तन विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व 13 जागांवर दैदीप्यमान विजय…

बोंडले ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या सर्वात महत्त्वाची समजली जाणारी बोंडले विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था बोंडले, ता. माळशिरस या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी स्वाभिमानी शेतकरी पॅनलचा धुरळा उडवून पॅनलचा सभासदांनी सुपडा साफ करून ह.भ.प. वै. बाळू पाटील परिवर्तन विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व 13 जागांवर दैदीप्यमान विजय संपादन केलेला आहे.

ह.भ.प. वै. बाळू पाटील परिवर्तन विकास आघाडीचे मधुकर पाटील, विजयसिंह माने देशमुख, सुभाष हिंमत, बहाद्दर चव्हाण, संताजी निकम, दत्तात्रय जाधव, भागवत पाटील, माणिक पाटील, लालासो जाधव, पंडित माने देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 13 उमेदवारांनी निवडणूक लढविली होती.

सर्वसाधारण कर्जदार खातेदार गटात निकम धनाजी दगडू,387, जाधव धनाजी लक्ष्‍मण 385, जाधव मधुकर तुकाराम 385, जाधव केशव तुकाराम 362, जाधव प्रल्हाद देवराव 361, निकम सुनील भानुदास 360, चव्हाण गोवर्धन चांगदेव 359, चव्हाण प्रताप शिवाजी 352, महिला प्रतिनिधी गटात चव्हाण नीलम शहाजी 392, पाटील मनिषा जयसिंग 356, अनुसूचित जाती जमाती गटात गायकवाड सुनील दास 386, इतर मागासवर्गीय गटात पालकर मनोहर विनायक 396, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात जाधव पांडुरंग निवृत्ती 377 असे 13 उमेदवार व त्यांना पडलेले मतदान आहे.

सत्ताधारी स्वाभिमानी शेतकरी पॅनल बलभीम चव्हाण रामचंद्र, चव्हाण श्रीरंग पाटील, काळजीवाहू चेअरमन संतोषकुमार देशमुख, चेअरमन रवींद्र डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली 13 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.

सर्वसाधारण कर्जदार खातेदार गटात बागल पोपट धोंडीराम 291, चव्हाण ज्ञानेश्वर महादेव 298, चव्हाण शिवाजी भानुदास 307, देशमुख संतोषकुमार दत्तात्रेय 326, डोंगरे रवींद्र मारुती 299, जाधव दत्तात्रेय व्यंकट 288, पाटील श्रीरंग माधवराव 299, पवार सतीश श्रीमंत 282, महिला प्रतिनिधी गटात चव्हाण ज्योती दगडू 323, माने देशमुख मैनाबाई भिमराव 302, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास वर्ग गटात थोरात आबासो शिवाजी 323, इतर मागास वर्गीय गटात शिंदे संभाजी सदाशिव 304, अनुसूचित जाती जमाती गटात नाईकनवरे बाळू दामू 314 असे 13 उमेदवार व त्यांना पडलेली मते आहेत.

बोंडले विकास सेवा सहकारी संस्थेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळातील 1946 सालची आहे. संस्थेला स्वतःची इमारत आहे. दोन कोटीच्या आसपास कर्ज वाटप केले जात असून, डिव्हीडंट देणारी ही संस्था आहे. संस्थेचे 1008 सभासद आहेत, त्यापैकी मतदानास 783 सभासद पात्र होते. त्यातील 717 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

सहाय्यक निबंधक कार्यालयाचे डी.पी. राऊत मतदान केंद्राध्यक्ष होते तर, जी.बी. जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व बी. डी. जरे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले‌. संस्थेचे सचिव विठ्ठल मोरे यांनी त्यांना सहकार्य केले. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांच्या विजयाची घोषणा करताच उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतीषबाजी, गुलालाची उधळण व वाद्यांच्या कडकडाटात आनंदोत्सव साजरा केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपंचायत राज समिती दौर्‍याने माळशिरस पंचायत समिती हादरली, अधिकारी व कर्मचारी अलर्ट
Next articleयुवा उद्योजक रितेश पालवे पाटील यांचा आदर्श समाजातील तरुणांनी घ्यावा – आण्णा पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here