बोगस कामे करून निधी हडपला

ग्रामविस्तार अधिकारी निलंबित, मात्र सरपंचाचे काय ?

मुखेड (बारामती झटका)

मुखेड तालुक्यातील दापका गुंडोपंत येथील ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामविस्तार अधिकारी व सरपंच यांनी १४ व्या वित्त आयोगाची व स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत लाखोंची बोगस कामे करून निधी हडप केल्याबद्दल दापका गुं. येथील ग्रामविस्तार अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले, पण सरपंचाचे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दापका गुं. ही तालुक्यातील मोठी १५ सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत असून महिला आरक्षणावरून डॉ. बालाजी झटकोडे यांची पत्नी जयश्री झटकोडे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली. या अगोदर पाच वर्ष सरपंच असलेले सुभाष जेसू राठोड या दोन्ही सरपंचांच्या काळात आणि ग्रामविस्तार अधिकारी पी.बी. पवार व गावचे बडे नेते यांनी संगनमत करून गावच्या विविध विकास कामांसाठी १४ व्या वित्त आयोगातून १ कोटी ५३ हजार २१२ रुपयांची कामे तर स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत १० लाख रुपयांची कामे केली. ही कामे अपुरी व कागदोपत्री करण्याचा मोठा प्रताप ग्रामविस्तार अधिकारी पि.बी. पवार, सरपंच जयश्री झटकोडे, सुभाष राठोड यांच्यासह पॅनलप्रमुख बडे नेते यांनी संगनमत करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून लाखो रुपयांचा निधी हडप केल्याबद्दल दापका गुं. येथील वैभव धनवे व प्रकाश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी उपोषण केले होते.

अहवालात कामात अनियमितता आली आढळून
ग्रामविस्तार अधिकारी पवार यांनी अभिलेख देण्यास टाळाटाळ केली विस्तार अधिकारी पी.एन. गरजे यांच्या २१ फेब्रुवारी २०२२ च्या अहवालानुसार कामात अनियमितता असल्याचे आढळून आले. यावरून गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी ग्रामविस्तार अधिकारी पवार यांना ८ मार्च रोजी तडकाफडकी निलंबित केले. पण सरपंच व माजी सरपंच यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleदेर आये दुरुस्त आये
Next articleभारतीय जनता पार्टीच्यावतीने बारामती येथील मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here